नवी दिल्ली : 5 किलोचा स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. घरगुती अनुदानित गॅस (एलपीजी) सिलिंडर दरात ६ रुपये ५२ पैशांनी कपात करण्यात आलेय. तर विनाअनुदानित गॅस सिलिंडर दरात १३३ रुपयांनी स्वस्त करण्यात आलाय. एलपीजी सिलिंडरची किंमत सहा महिन्यांनंतर कमी केली गेली आहे. यापेक्षाही आनंदाची बातमी समोर येतेय. केवळ ओळखपत्र दाखवून तुम्हाला स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर मिळाला तर ? हो. हे शक्य आहे.


ओळखपत्र दाखवा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 केवळ ओळखपत्र दाखवून ग्राहकांना 5 किलोचा स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर मिळण्याची प्रक्रीया पार पडणार आहे. यासाठी वाट पाहण्याची गरज लागणार नाही. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC) च्या ग्राहकांना हा लाभ मिळणार आहे. 


इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने केलेल्या ट्वीटनुसार, ग्राहकांना आपल्या शहरातील वितरक किंवा विक्री केंद्रावर या गॅस सिलेंडर तुम्ही खरेदी करु शकता.


कंपनीच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना केवळ आपल ओळखपत्र दाखवाव लागणार आहे.


ओळखपत्र दाखवून 5 किलोचा स्वयंपाक गॅस सिलिंडर ते खरेदी करू शकतात. खूप मोठ्या प्रक्रियेतून जाण्याचा त्यांचा वेळ यामुळे वाचणार आहे.


किंमत 


  IOC च्या वेबसाईटनुसार, दिल्लीमध्ये 5 किलो च्या स्वयंपाक गॅस सिलिंडरची किंमत सबसिडी शिवाय 295 रुपये इतकी आहे.


दर कमी 


जून 2018 पासून एलपीजीच्या किमती वाढत होत्या. 1 नोव्हेंबर रोजी आयओसी सब्सिडीमध्ये एलपीजी सिलिंडरमध्ये वाढ 2.94 रुपयांनी वाढली होती. आयओसीने म्हटले आहे की, नॉन-सबसिडीड एलपीजी सिलिंडरची किंमत 133 रुपये कमी करण्यात आली आहे.


आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रूड ऑइलच्या किंमती कमी झाल्यामुळे एलपीजीच्या किंमती कमी झाल्या आहेत.


दिल्ली अनुदानित 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 809.50 रुपयांत मिळेल. 1 डिसेंबरपासून नवीन किमती लागू होती. आतापर्यंत 942.50 रुपये किंमत होती.