Shraddha Walkar Murder Case: संपूर्ण देशाला हादरवून होणाऱ्या श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder Case) प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) कसून तपास सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी 75 दिवसांमध्ये सहा हजारांहून अधिक पानांचं चार्जशीट दाखल केलं आहे. यादरम्यान हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? याची माहितीही समोर आली आहे. श्रद्धा आणि आफताबमध्ये (Aftab Poonawala) नेमकं असं काय झालं होतं ज्यामुळे त्याने तिची हत्या केली आणि मृतदेहाचे इतक्या निर्दयीपणे तुकडे केले याचा खुलासा झाला आहे. जाणून घेऊयात नेमकं त्यादिवशी काय घडलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रद्धा वालकर आणि आफताबची भेट सोशल आणि डेटिंग अॅप बंबलच्या माध्यमातून झाली होती. यानंतर दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. कुटुंबाचा नात्याला विरोध असल्याने श्रद्धा मुंबई सोडून आफताबसह दिल्लीत आली होती. आफताबलाही दिल्लीत नोकरी लागली होती. 


18 मे 2022 रोजी आफताबने श्रद्धाची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करुन ते जंगलात फेकून देत त्यांची विल्हेवाट लावली. हत्येच्या सहा महिन्यानंतर हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देसभरात खळबळ माजली होती. दरम्यान हत्येच्या दिवशी आणि एक दिवस आधी नेमकं काय झालं होतं हे जाणून घेऊयात...


17 मे 2022


दिल्लीत आल्यानंतरही श्रद्धा बंबल अॅपचा वापर करत होती. या अॅपच्या माध्यमातून तिची गुरुग्राममध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी ओळख झाली होती. त्याला भेटण्यासाठी श्रद्धा 17 मे 2022 रोजी गुरुग्रामला गेली होती. 


18 मे 2022


श्रद्धा गुरुग्रामला गेल्यानंतर संध्याकाळी घऱी परतली नव्हती. श्रद्धा नेमकी कुठे गेली आहे याची माहिती नसल्याने आफताब संतापला होता. श्रद्धा फोनही घेत नव्हती. दुसऱ्या दिवशी 18 मे रोजी श्रद्धा सकाळी 11 वाजता परतली होती. पोलिसांना श्रद्धाचं सीसीटीव्ही मिळालं आहे. या सीसीटीव्हीत श्रद्धा फ्लॅटमध्ये परतत असल्याचं दिसत आहे. 


फ्लॅटमध्ये येताच आफताब समोर उभा होता. तो आधीच संतापलेला होता. श्रद्धा दिसताच त्याने तू रात्रभर कुठे होतीस? रात्री परत का आली नाहीस? असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. 


गळा दाबून श्रद्धाची हत्या


श्रद्धाने यावेळी तुला काय करायचं आहे? माझ्या मनाला जे वाटेल ते मी करणार असं उत्तर दिलं. श्रद्धाचं हे उत्तर ऐकून आफताब संतापला आणि तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने दोघंही शांत झालं होतं. दोघांनी ऑनलाइन जेवणही मागवलं हों. पण रात्री पुन्हा एकदा आफताब श्रद्धावर संतापला. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यानंतर आफताबने श्रद्धाला खाली पाडलं आणि तिला गळा दाबला. 


आफताबने नखंही जाळून टाकली


सुरुवातीला आफताब बॅगेतून मृतदेह नेत हिमालच प्रदेशात विल्हेवाट लावण्याचा विचार करत होता. पण पोलीस चेकिंगमध्ये आपण सापडू अशी भीती वाटत असल्याने त्याने ही योजना रद्द केली. यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे करण्याचं ठरवलं आणि घऱातच धारदार शस्त्राने तुकडे केले. हे माणसाच्या शरिराचे तुकडे असल्याचं समजू नये यासाठी त्याने छोटे तुकडे केले होती. इतकंच नाही तर त्याने हाताची बोटं आणि नखं कापून जाळून टाकली. आफताबने पोलिसांसमोर याची कबुली दिली आहे.