Shraddha Murder Case: पोलीस तपासात CCTV Video समोर, पहाटे 4 वाजता आफताब 3 वेळा...
Shraddha murder case Update:सध्या पोलिसांच्या हाती 18 नोव्हेंबरचं सीसीटीव्ही फुटेज ( CCTV footage) हाती लागलं आहे. त्यामध्ये आफताब पहाटे 4 वाजता एका काळ्या बॅगसह बाहेर जाताना दिसतोय.
Shraddha Murder Case CCTV Video: श्रद्धा वालकर खून प्रकरणात (Shraddha Walkar) नवी दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाने गुरुवारी आरोपी आफताब पूनावाला (Aftab Amin Poonawalla ) याला 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. देशातील थरारक हत्याकांड प्रकरणात आता दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर आल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता या प्रकरणात नवी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. (Shraddha murder case CCTV footage of Aftab Poonawala)
तीन वेळा CCTV मध्ये दिसला...
सध्या पोलिसांच्या हाती 18 नोव्हेंबरचं सीसीटीव्ही फुटेज ( CCTV footage) हाती लागलं आहे. त्यामध्ये आफताब पहाटे 4 वाजता एका काळ्या बॅगसह बाहेर जाताना दिसतोय. आफताबच्या घराबाहेरील सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाल्याचं दिसतंय. त्याचरात्री आफताब (Aftab) रात्री तीन वाजता देखील सीसीटीव्हीमध्ये दिसला होता. त्यानंतर आणखी एकदा... असे तीन वेळा आफताब सेक्यूरिटी कॅमेऱ्यात कैद झाला.
आत्तापर्यंत पोलिसांना काय सापडलं?
दिल्ली पोलिसांना (Shraddha Murder Case) आतापर्यंत श्रद्धाच्या मृतदेहाची 13 हाडं सापडली आहेत. मात्र, पोलिसांना अद्याप श्रद्धाचं डोकं आणि तिचा मोबाईल सापडलेला नाही. श्रद्धाचे 35 तुकडे करण्यात आले होते. त्यामुळे तिचा शोध अद्यापही पुर्ण झालेला नाही. आफताबने ज्याच्याकडून करवत घेतली होती. त्या दुकानदाराचा शोध अद्याप घेता आला नाही तर दुसरीकडे फ्रिज खरेदी केलेल्या दुकानदाराला देखील काही आठवत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
पाहा Video -
दरम्यान, पोलिसांनी आफताबचा फोन तपासल्यानंतर अनेक वेगवेगळे प्रकार समोर आले आहेत. तसेच पोलीस तपासात (Police Investigation In Shraddha Murder Case) श्रद्धाच्या व्हॉट्सअप चॅट आणि इन्स्टाग्रामवरील मेसेजेचे स्क्रीनशॉट देखील समोर आले आहेत. त्यात मैत्रिणींना आपल्या वेदना बोलून दाखवल्याचं समजतंय.