Shraddha Murder Case: संपूर्ण देशाला हदरवणाऱ्या बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणात (Shraddha Murder Case:) दर मिनिटाला नवनवीन धक्कादायक माहिती पुढे येत आहे. सुरूवातीला श्रद्धा वालकरचे असे काही फोटो समोर आले आहेत ज्यावरून या हत्येचा संपूर्ण कट कसा रचला गेला याचा अंदाज लावण्यात येत होता. श्रद्धाचे (Shraddha Walkar) सहा फोटो पुढे आले आहेत, जे संपूर्ण कट कसा रचला गेला हे सांगतात. तिचे जो फोटो पुढे आले आहेत, त्यातील एका फोटोत आफताब हा किती निर्दयी आणि क्रूर असेल हे दिसून येतं. त्यानंतर आता श्रद्धा वालकर कॉलेज मध्ये असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रद्धा वालकरच्या हत्येच्या बातमीनंतर तिच्या कॉलेजच्या (Shraddha Walkar College) मैत्रिणींनाही धक्का बसला आहे. तिच्यासोबत तीन वर्षे कॉलेजमध्ये शिकलेला रजत शुक्ला, श्रद्धा नेहमी सक्रिय असायची असे म्हणत श्रद्धाची आठवण काढतो. 18 मे 2022 रोजी 27 वर्षीय श्रद्धा वालकरची 28 वर्षीय प्रियकर आफताब पूनावालाने गळा दाबून हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. पण या भीषण घटनेच्या पलीकडे पाहिलं तर श्रद्धा ही एक थिएटर अॅक्टर होती. तिला नाटक करण्याची आवड होती तसेच तिला पुढे जाऊन पत्रकार व्हायचं होतं.


वाचा: श्रद्धा वालकर आज वाचली असती; 2 वर्षापूर्वीच लागली होती मृत्यूची कुणकुण?


 


मित्र श्रद्धाला '4G' म्हणायचे


श्रद्धाने मुंबईतून मास मीडियामध्ये (mass media) ग्रॅज्युएशन केले.  त्यावेळी श्रद्धाच्या जवळच्या मित्रांपैकी एक असलेले रजत शुक्ला म्हणला की, श्रद्धाला (Shraddha Walkar's nick name) आम्ही टोपणनाव म्हणून '4G' असे ठेवले होते. कारण तिची पिक्सी हेअरस्टाइल एअरटेलच्या लोकप्रिय जाहिरात अभिनेत्रीं सारखी होती. 


त्याचदरम्यान श्रद्धा वालकर बीएमएम (Shraddha Walkar Educations) शिकत असताना तिच्या नाटकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तिला नाटकाची आवड असल्यामुळे एका प्रोजेक्टसाठी तिच्या वर्गात तिने एक नाटक सादर केलं होतं. तुम्ही हा व्हिडिओ नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, व्हिडिओमध्ये डाव्या बाजूला मैत्रिणींसोबत उभी आहे. 



काय आहे प्रकरण 


18 मे 2022 रोजी आफताब पूनावाला याने 18 मे रोजी संध्याकाळी श्रद्धा वालकर (27) हिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले, जे त्याने दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या निवासस्थानी सुमारे तीन आठवडे 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर श्रद्धाचे शरीराच्या तुकड्यांने त्याने दिल्लीतील अनेक ठिकाणी फेकूण दिले.