एकदोन नव्हे, तब्बल 38 वर्षांनंतर सियाचीनमधील `तो` शहीद घेणार कुटुंबियांचा अखेरचा निरोप
काळजात चर्रss करणारी बातमी
Chandrashekhar Harbola Siachen: 1984 मध्ये (Siachen) सियाचीन येथे शहीद झालेल्या 19 कुमाऊ रेजिमेंटमधील जवान (19 Kumaon Regiment) चंद्रशेखर हर्बोला (Chandrashekhar Harbola) यांचं पार्थिव त्यांच्या घरी तब्बल 38 वर्षांनंतर पोहोचणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार सियाचीनमध्ये त्यावेळी आलेल्या हिमवादळामध्ये 19 जण बर्फाखाली दबले होते. ज्यानंतर शोधमोहिमेतून 14 जवानांना मृतावस्थेत बर्फातून बाहेर काढण्यात आलं. पण, 5 जवानांचा काहीच शोध लागू शकला नव्हता. शोध न लागू शकेल्यांमध्ये शहीद लांस नायक हर्बोला यांचाही समावेश होता.
(Snow Storm) हिमवादळानं त्यांच्या जगण्यावरच घाला घातला. ज्यानंतर तब्बल 38 वर्षांचा काळ उलटल्यानंतर आता चंद्रशेखर हर्बोला यांचं पार्थिव शरीर त्यांच्या घरी पोहोचणार आहे.
ऑपरेशन मेघदूतदरम्यान शहीद...
चंद्रशेखर हर्बोला 29 मे 1984 रोजी सियाचीनमध्ये ऑपरेशन मेघदूतदरम्यान शहीद झाले. (Operation Meghdoot) या मोहिमेत 19 जवांनानी प्राण गमावले होते.
हर्बोला यांचं पार्थिव मिळाल्याची माहिती मिळताच त्यांच्या घरी शोकाकूल वातावरण झालं. इतक्या वर्षांनंतर अखेर भारतमातेचा हा सुपूत्र त्याच्या अखेरच्या प्रवासाला निघणार आहे, या भावनेनं प्रत्येकाचं मन गहिवरून आलं. चंद्रशेखर हर्बोला यांनी देशाची सेवा करताना प्राण त्यागले, या भावनेनं मात्र त्यांच्या देशसेवेचा कुटुंबीयांना गर्वही आहे.
देशाच्या स्वातंत्र्य दिनी (Independence Day ) म्हणजेच आज त्यांचं पार्थिव मूळ गावी पोहोचणार असून, तिथे संपूर्ण लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.