Karnataka CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांचे नाव आघाडीवर
Karnataka New CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या उपस्थित तोडगा काढण्यात येणार आहे. थोड्याचवेळात मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.
Karnataka New CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होतील याला दुजोरा मिळाला आहे. त्यांच्या नावाची लवकरच काँग्रेस पक्षाकडून घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
कर्नाटक या दक्षिणेकडील राज्याचा पुढील मुख्यमंत्रिपदावरुन सध्या निर्माण झालेल्या पेच कायम आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल संध्याकाळी दोन प्रमुख दावेदार सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांची भेट घेतली. या दोघांना दिल्लीत राहण्यास सांगण्यात आले आहे, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे दोघेही सर्वोच्च पदासाठी दावे करत आहेत आणि त्यांचे समर्थक त्यांच्यासाठी जोरदार लॉबिंग करत आहेत. दुपारनंतर बैठकांची पुढील फेरी होणार असून त्यानंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
आज बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दिल्लीत मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हेच दोघे दावेदार आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सक्रिय झाले आहेत. राहुल हे दोन्ही दावेदारांना भेटत आहे. त्यांनी प्रथम सिद्धरामय्या यांची भेट घेतली आणि थोड्याच वेळात शिवकुमार यांची भेट घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधीच कर्नाटकचे मुख्यमंत्री ठरवतील. गरज पडल्यास ते सोनिया गांधी यांच्याशी बोलतील. सोनिया सध्या शिमल्यात आहेत.
काँग्रेस नेते एचसी बालकृष्ण म्हणाले की, डीके शिवकुमार यांनी कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे काम केल्यामुळे आम्ही हायकमांडला विचार करण्याची विनंती करत आहोत. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असावेत. त्याचवेळी कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते डॉ.परमेश्वरा म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीमध्ये कोणताही वाद नाही, हे मी स्पष्ट करतो. एक प्रक्रिया अवलंबली जात आहे. पक्ष हायकमांड मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांची बैठक घेत असून आज किंवा उद्या अंतिम निर्णय दिला जाणार आहे.