Mutual Fund मध्ये SIP गुंतवणुकीसाठी सोपं गणित, नुकसानीची शक्यता फारच कमी
बाजारात घसरण होत असताना एखादी व्यक्ती दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहिली, तर मालमत्ता मूल्य वाढतच जाते.पण म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी दोन फॉर्म्युला फॉलो केल्यास नुकसानीची शक्यता फारच कमी असते.
Mutual Fund: म्युच्युअल फंडात गुंतवणूक काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. कारण एक चूक महागात पडू शकते. म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे गुंतवणुकीसाठी बाजारातील स्थिती आणि वेळ अत्यंत महत्त्वाची असते. पण बाजारात घसरण होत असताना एखादी व्यक्ती दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहिली, तर मालमत्ता मूल्य वाढतच जाते.पण म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी दोन फॉर्म्युला फॉलो केल्यास नुकसानीची शक्यता फारच कमी असते. प्रत्येक महिन्याला ठरावीक गुंतवणूक करून 15 वर्षात कोट्यधीश होऊ शकता. तसेच हा फॉर्म्युला वापरल्यास 30 वर्षांच्या गुंतवणुकीत 10 कोटीहून अधिक रुपये कमवू शकता.
Formula 1- गुंतवणूक सल्लागार बळवंत जैन यांच्या सल्ल्यानुसार, म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी दोन प्रकारची सूत्रे आहेत. पहिले सूत्र 15*15*15 आहे. या सूत्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीने 15% रिटर्न दराने 15 वर्षे दरमहा 15,000 रुपये गुंतवले तर त्याच्याकडे सुमारे 1.02 कोटी रुपयांचा निधी असेल.
Formula 2- गुंतवणुकीचे दुसरे सूत्र 15*15*30 आहे. या सूत्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीने 15 टक्के परताव्याच्या दराने 30 वर्षे दरमहा 15 हजार रुपये गुंतवले तर त्याच्याकडे 10.51 कोटी रुपयांचा निधी असेल. या दरम्यान, तो 54 लाख रुपयांची गुंतवणूक करेल आणि परतावा वाढून 9.97 कोटी रुपये होईल. एखादी व्यक्ती म्युच्युअल फंडात जास्त काळासाठी जितकी जास्त SIP करते तितका जास्त फायदा त्याला मिळेल.
Debit Card घरी विसरलात तरी चिंता नसावी, अशा पद्धतीने काढाल एटीएममधून पैसे
पाच वर्षांच्या विलंबामुळे होईल नुकसान
वय वर्षे 25 असताना गुंतवणूकदाराने एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यास पाच वर्षे उशीर केल्यास नुकसान होईल. पाच वर्षानंतर त्याचं वय 30 असेल. उदाहरणार्थ, 30 व्या वर्षी दरमहा 5000 रुपये गुंतवल्यास 25 वर्षे गुंतवणूक करेल. म्हणजेच वयाच्या 55 व्या वर्षी सरासरी 12 टक्के परताव्यासह एकूण 84,31,033 रुपये मिळतील. हीच गुंतवणूक त्याने 25 व्या सुरू केली असती तर गुंतवणूक 30 वर्षांसाठी झाली असती. मॅच्युरिटीच्या वेळी सरासरी 12 टक्के परताव्यासहएकूण 1,52,60,066 रुपये मिळाले असते.