नवी दिल्ली : कोरोनाचं (Corona) संकट आलं आणि जगण्याची परिभाषा बदलली. पाहता पाहता, अनेक गणितं नव्या रुपानं मांडली जाऊ लागली. ऑफिसपासून ते अगदी शाळांपर्यंत सर्वकाही ( Online) ऑनलाईन पद्धतीनं पार पडू लागलं. अनेकांसाठी हा ऑनलाईन मार्ग सोयीचा ठरला. पण, काहींसाठी मात्र नव्या अडचणी निर्माण करुन गेला. अगदी शिक्षक वर्गालासुद्धा यामुळं मर्यादांपलीकडली अवहेलना झेलावी लागत असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गायिका आणि दाक्षिणात्य सेलिब्रिटी चिन्मयी श्रीपदा हिनं अशीच धक्कादायक घटना सर्वांसमोर आणली आहे. जे पाहता अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकतेय. चिन्मयी श्रीपदा (Chinmayi Sripaada) हिनं महिला शिक्षकांनी सांगितलेल्या काही प्रसंगांना तिच्या पोस्टद्वारे शेअर केलं आहे. विद्यार्थ्यांकडून कशा प्रकारे त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं ते सांगितलं. ज्यामध्ये शिक्षकांना गुप्तांगांचे फोटोही पाठवल्याची घटना घडल्याचं या पोस्टमधून कळत आहे. 


'इतनी शक्ती हमे दे न दाता..',. फेम गायिकेवर उतारवयात हलाखीची परिस्थिती


 


ऑनलाईन शिक्षणाचा ट्रेंड आता चांगलाच स्थिरावू पाहत आहे. तंत्रज्ञानामध्ये होणाऱ्या प्रगतीमुळं आता शिक्षणापासूनही कोरोना काळात बहुतांश विद्यार्थी वंचित राहिेले नाहीत. असं असलं तरीही ऑनलाईन शिक्षणाची ही भरकटलेली वाट मात्र वेळीत मार्गी लावली पाहिजे, नाहीतर स्थिती आणखी चिघळण्याची भीती नाकारता येत नाही. 




चिन्मयी श्रीपदानं शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकरी आवेगात व्यक्त झाले, काहींनी तीव्र संताप व्यक्त केला. तर, या साऱ्याचा सामना करणाऱ्या शिक्षकांबाबतही नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली.