मुंबई : गुरूवारी भारतात कोरोनाबाधितांचा आकडा रेकॉर्ड ब्रेक करणारा होता. गेल्या २४ तासांत कोरोनाबाधित ८३,८८३ रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात एवढे रुग्ण ही आतापर्यंतची सर्वात मोठी नोंद आहे. यानुसार आतापर्यंत भारतात ३८,५३,४०७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये ८.१५ लाख केस ऍक्टिव आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा ८.८ लाखावर गेला आहे. आंध्रप्रदेशमध्ये हा आकडा ४. लाख आहे. आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत ११,७०,००० हून अधिक केस ऍक्टिव आहेत. 



देशाचा विचार करायचा तर कोरोना संक्रंमितांचा आकडा हा २.५९ करोडवर पोहोचला आहे. आतापर्यंत ८.६१ लोकांनी आपला जीव गमावला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा हा ६२.५७ लाखावर पोहोचला आहे. तर ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ३९.५२ लाखाहून अधिक आहे. 



कोरोनाने संपूर्ण देशाला वेठीस धरलं आहे. प्रत्येक देश एकत्र येऊन यावर मात करण्यासाठी लस संशोधन करत आहे. अमेरिकेने मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत लस संशोधनासाठी हातभार न लावण्याचं म्हटलं आहे. अमेरिका कोरोनावर स्वतंत्र्य लस शोधण्याच्या प्रयत्नात आहे.