मुंबई : डायबिटीज (diabetes) रूग्णांसाठी मोठी बातमी. डायबिटीजवर लवकरच भारतीय बनावटीची लस येणारंय. त्यासाठी संशोधकांनी कंबर कसलीय. या लसीबाबत संशोधकांनी नेमका काय दावा केलाय हे आपण जाणून घेऊयात. (single dose will save from corona diabetes and tb icmr started major research on this drug)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात प्रत्येक 10 रूग्णांमागे एक रूग्ण डायबिटीज पेशंट असल्याचं आढळून येतोय. बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातच अनेकांना डायबिटीजचा त्रास होऊ लागलाय. पण आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण लवकरच एक अशी लस येणार आहे जिचा एक डोस घेतल्यानंतर डायबिटीज, टीबीसारख्या आजारांना मात देता येऊ शकेल. 


इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ICMRनं बीसीजी लसीवर संशोधन सुरू केलंय. नवजात बाळांना ही लस दिल्यानंतर त्यांच्यातील रोगप्रतिकारशक्ती वाढेल तसच डायबिटीज, टीबी आणि कोरोनासारख्या आजारांना ही लस दूर ठेवेल असा दावा संशोधकांकडून केला जातोय. 


भारतात जवळपास 8 कोटी लोकांना डायबिटीजचा आजार आहे. 2045 पर्यंत डायबिटीज रूग्णांची संख्या 12 कोटींपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे 8 कोटींपैकी अडीच कोटी डायबिटीज रूग्ण हे 20 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर भारतात दरवर्षी डायबिटीजमुळे सरासरी 6 लाख लोकांचा मृत्यू होतोय. 


डायबिटीजचा वाढता धोका लक्षात घेता या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात संशोधन केलं जातंय. त्यात भारतीय संशोधकांना बऱ्यापैकी यश मिळताना दिसतंय. त्यामुळे ही लस भविष्यात डायबिटीजचं समूळ उच्चाटन करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा करायला हरकत नाही.