कोरोना : फक्त एक चूक आतापर्यंतच्या सर्व उपायांवर फिरवू शकते पाणी
कोरोनाच्या बाबतीत आता ही एक चुकही पडू शकते भारी...
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव आणि देशातील स्थिती याबाबत केंद्र सरकारने सोमवारी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी म्हटले आहे की, देशात लॉकडाऊन दरम्यान 100% लोकांपैकी जर 99% लोकं लॉकडाऊनचे अनुसरण करतात तर 1% जर लोकांनी या गोष्टींचे पालन केले नाही तर देशातील सर्व तयारी पूर्णपणे निरुपयोगी ठरतील. मग लॉक डाउनला काही अर्थ राहणार नाही. कोरोना विषाणूचा पूर्णपणे प्रतिबंध करण्यासाठी, 100 टक्के लॉकडाउनचं अनुसरण करणे आवश्यक आहे.
लव अग्रवाल यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनचा परिणाम दिसून येतो आहे आणि आम्ही सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहोत. आपला देश 12 दिवसांत 100 वरुन 1000 वर आला आहे. तर विकसित देशांमध्ये 12 दिवसांत 3500, 5000, 8000 प्रकरणे समोर आली होती. देशात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 92 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.
सरकारच्या वतीने आवाहन करण्यात आलं होतं की, प्रत्येक परिस्थितीत समाजातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करण्याची आवश्यकता असते. जर कोणतीही व्यक्ती सूटली किंवा त्याने सहकार्य न केल्यास परिस्थिती पुन्हा शून्यावर येईल. 100% प्रयत्न करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या वतीने देशात सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पंतप्रधानांनी 10 सशक्त गट स्थापन केले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव प्रेम अग्रवाल म्हणाले की 100% मार्गदर्शक मार्गाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि जर 99% काम केले तर सर्व काही निरुपयोगी होईल.
कोरोना व्हायरसपेक्षा जुन्या लोकांमध्ये आणखी काही समस्या आहेत, त्यांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी केंद्र सरकारने काय करावे व काय करू नये याबद्दल सल्ला दिला आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी समर्पित रुग्णालये तयार करण्यावर भर देत आहेत आणि देशभरात त्यांची तयारीही केली जात आहे. प्रत्येकाला सावध आणि जागरूक असणे आवश्यक आहे.
आरोग्य मंत्रालयाने एक गोष्ट खास सांगितली आहे की, तुम्हाला काही शंका असल्यास लपवू नका. कोणीही अशी घटना लपवून ठेवल्यास त्याचे संपूर्ण परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतील.
या पत्रकार परिषदेत गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी म्हटलं की, लॉकडाऊन दरम्यान येणाऱ्या समस्या नियंत्रण कक्षातून सोडवल्या जात आहे. जे वंचित आहेत, कामगार विभाग आहे अशा सर्व लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे.