SIP investment | 5 वर्षात बना शानदार कारचे मालक ; दररोज फक्त 200 रुपये वाचवा
आजच्या जमान्यात कार हौस किंवा मिरवायचे साधन नाही तर गरज बनली आहे.
Mutual Fund SIP : आजच्या जमान्यात कार हौस किंवा मिरवायचे साधन नाही तर गरज बनली आहे. प्रत्येकजण आपली स्वतःची कार असावी यासाठी प्रयत्न करतो. आज सामान्य फीचर्सच्या कार देखील 5-6 लाखांपासून सुरू होतात. जर ज़ॉब सुरू करण्यासोबतच नियमित गुंतवणूक सुरू केली. तर एवढा फंड तुम्ही आरामात जमवू शकता. यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. जर तुम्ही 200 रुपये दररोज बचत करीत असाल. तर पाच वर्षात आरामात 5-6 लाखापर्यंत फंड बनू शकतो. मार्केटच्या उतार-चढीसोबतच रिटर्नसुद्धा बदलत असतो.
समजा तुम्ही दररोज 200 रुपयांची बचत केली आहे. तर तुम्ही महिन्याला 6 हजार रुपये वाचवता. जर दरमहिन्याला 6 हजारांची SIP पुढील 5 वर्षांसाठी सुरू ठेवली तर.5.38 लाख रुपयांचा फंड तुम्ही बनवू शकता. यामध्ये SIPचा वार्षिक 15 टक्के रिटर्न गृहित धरला आहे. म्हणजेच 5 वर्षात तुम्ही शानदार कारचे मालक होऊ शकता.
बीपीएन फिनकॅपचे डायरेक्टर एके निगम यांचे म्हणणे आहे की, SIPमध्ये गुंतवणूक करणे ही बचतीची सिस्टॅमॅटिक पद्धत आहे. यामध्ये गुंतवणूकदाराची थेट बाजार बाजाराशी रिस्क नसते. रिटर्न्ससुद्धा पारंपारीक बचतीच्या पद्धतीपेक्षा जास्त मिळतो. यामध्येदेखील रिस्क असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपले उत्पन्न, टार्गेट आणि रिस्क प्रोफाईल पाहून गुंतवणूकीचा निर्णय घ्यायला हवा.