Same Sex Marriage : नुकताच व्हेलेंटाईन वीक (Velentine Day)(प्रेमाचा आठवडा) संपन्न झाला आहे. या आठवड्यात अनेक तरूण-तरूणी कपल बनले. या दरम्यान अनेक लव्हस्टोऱ्या (Love story) समोर आल्या होत्या. अशीच एक अनोखी लव्हस्टोरी आता समोर आली आहे.या लव्हस्टोरीत एकाच घरात राहणारे वहिनी (Sister in Law) आणि नणंद एकमेकांच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. या कपलने पुढे जाऊन लग्न देखील केले. त्यांचा संसार खुप चांगला चालला होता.मात्र आता या संसारावर एक मोठं संकट आलं आहे.हे संकट नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात. 


प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धरहरा गावात किराणा दुकान चालवणाऱ्या प्रमोद कुमार यांचे लग्न (Marriage) 2013 मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार (Hindu Rituals) शुक्ला देवीशी झाले होते. या लग्नानंतर दोघेही संपूर्ण कुटुंबासोबत राहू लागले होते. या लग्नातून दोघांना दोन मुलेही झाली. दोघांच्याही आयुष्यात सर्व कस आनंददायी सूरू होते. मात्र एका घटनेने मोठा बदल झाला. 


नणंदवर जीव जडला...


प्रमोद कुमार यांची बायको शुक्ला देवी नणंद सोनी देवी यांच्या प्रेमात पडली होती. या प्रेमानंतर दोघांनी लग्न (Marriage) करण्याचा निर्णय देखील घेतला. त्यानुसार दोघांनीही पाच महिन्यांपूर्वीच एकमेकांशी लग्न केले. दोघेही पती-पत्नीसारखे राहू लागले. शुक्ला देवीच्या नवरा प्रमोदला या घटनेची कल्पना होती. मात्र, दोघांच्या संमतीमुळे तो काही बोलू शकला नाही आणि सर्वजण एकत्र राहू लागले.


नात्यात आला ट्विस्ट 


प्रमोद कुमार आणि त्याची बायको शुक्ला देवी आणि सोनी देवी या तिघांच आयुष्य सुरळीत चालू होत. मात्र या नात्यात एक ट्विस्ट आला. या घटनेत सोनी देवीची मोठी बहीण उषा देवीची एन्ट्री झाली. आणि तिने शुक्ला देवीपासून सोनी देवीला दुर नेण्याचा प्रयत्न केला. उषा देवी घरात येऊन सोनी देवीला घेऊन गेली. 


पोलीस ठाण्यात प्रकरण


शुक्ला देवी आणि पती प्रमोद या दोघांनी रोसडा पोलीस ठाणे (Police) गाठले. शुक्ला देवी यांनी पोलिसांना सांगितले की, शुक्रवारी दुपारी 1 वाजता त्यांची मोठी वहिनी उषा देवी 10-15 जणांसह त्यांच्या घरी आल्या आणि त्यांनी सोनी कुमारीला जबरदस्तीने सोबत नेले.तसेच शुक्ला देवीने तिची मोठी मेहुणी उषा देवी (40 वर्ष) हिने सोनीचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. तसेच ती सोनीवर खूप प्रेम करते, तिच्याशिवाय राहू शकत नाही, असे शुक्ला देवी म्हणते.


दरम्यान पोलिस (Police) ठाण्यात शुक्ला देवी सोबत तिचे पती प्रमोद देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे या दोघांच्या नात्याला प्रमोद यांचा पाठींबा होता. तसेच त्याच्यात या नात्याबद्दल नाराजी नव्हती. याउलट शुक्ला यांना जे आवडते त्यांनी ते करावे, या मताचे प्रमोद होते. 


शुक्ला देवी नावाच्या महिलेने अर्ज दिला आहे. अर्जाच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या प्रकरणावर रोसडा पोलीस ठाण्याचे अध्यक्ष कृष्ण प्रसाद यांनी सांगितले आहे. 


बिहारच्या (Bihar) समस्तीपूरमध्ये (Samastipur) ही घटना घडली आहे. या घटनेची संपुर्ण राज्यभर चर्चा आहे.