मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनाही सज्ज झाली आहे. मात्र सीमावर्ती भागात महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलंय.  शिवसेना बेळगाव आणि इतर सीमावर्ती मतदारसंघांमध्ये उमेदवार उभा करणार नाही. तसंच इतर पक्षांनीही एकीकरण समितीच्या विरोधात उमेदवार उभा न करणयाचं आवाहन राऊतांनी केलं. कर्नाटकात शिवसेनेचे उमेदवार निवडून आले तर सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


काय म्हणाले संजय राऊत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी २९ मार्च रोजी बेळगावात खासदार संजय राऊत दाखल झाले होते.... 'आम्हाला बेळगावात जाण्याची परवानगी हवीय... पाकिस्तानात जाण्याची नाही. बेळगाव महाराष्ट्राचाच एक भाग आहे... दोघांचा इतिहास सारखाच आहे, दोघांची संस्कृती सारखीच आहे. या सीमावर्ती भागावर कोर्टाचा निर्णय येईलच. पण तेव्हापर्यंत हे क्षेत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात यावं, अशी आम्ही मागणी करतोय' असं त्यांनी या जाहीर सभेत म्हटलंय.


जेव्हा कधी बेळगाव आणि इतर सीमावर्ती भागातील नागरिकांवर अन्याय होतो, तेव्हा त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या सर्वच भागांत दिसून येतोय. काश्मीर, सतलज आणि बेळगावचा प्रश्न लोकशाही पद्धतीनं सोडविला जात नसेल तर तो आम्ही 'ठोकशाही'नं सोडवू, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. 


पहा व्हिडिओ