नवी दिल्ली : चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना व्हायरसने जगात हाहाकार माजवला आहे. आग्रामधील एका कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता. परंतु आता त्या कुटुंबाचा अहवाल निगेटिव्ह आलाय. सध्या त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलंय. आग्रामधील कपूर कुटुंबिय २५ फेब्रुवारीला इटलीहून परतलं होतं. तेव्हापासून त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. तसंच पुण्यातील लॅबमध्ये त्यांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. ते रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीमध्ये कोरोनाची लागण झालेला एक रुग्ण आढळून आल्यानंतर आता ही संख्या वाढते की काय अशी भीती व्यक्त होऊ लगालीये. याची पहिली शिकार ठरवीये नॉएडामधली श्रीराम मिलेनियम स्कूल... ही शाळा कोरोनाच्या भीतीनं ६ तारखेपर्यंत बंद करावी लागलीये.. काही मुलं कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्याचं समजताच शाळेतून सर्व पालकांना मेसेज गेले आणि आपल्या मुलांना घेऊन जाण्याची सूचना करण्यात आली. 


भारताच्या आरोग्य मंत्रालयाने इटली, ईराण, साऊथ कोरिआ, आणि जपानहून येणाऱ्या प्रवशांचा व्हिजा रद्द केलाय. ३ मार्चनंतर या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना भारताचा व्हिजा नाकारण्यात आलाय. कोरोना व्हायरसमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. 


आतापर्यंत ३२०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शिवाय भारतात ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाले आहे.