``मोदीजी तुम्ही खूप ...``,पंतप्रधानांनाही खडबजडून जागं करेल चिमुकलीचे `हे` पत्र
पेन्सिल, रबर, मॅगीही महागलीय...आता पेन्सिल मागितली तर आई मारते,चिमुकलीच्या पत्राची सोशल मीडियावर एकचं चर्चा
कन्नौज : देशात महागाई खुपच वाढली आहे. घरगुती गॅस पासून अनेक जीवनावश्यक वस्तु महागल्या आहेत. या वाढत्या महागाईची तक्रार एका चिमुकलीने पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. हे पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यात छिब्रामाऊ शहरात राहणाऱ्या एका सहा वर्षांच्या चिमुकलीने पंतप्रधान मोदींना पत्र लिहले आहे.या पत्रात तिने पंतप्रधान मोदी यांच्याकडे तक्रार केल्याचीही घटना घडलीय.
चिमुकलीच्या पत्रात काय?
'पंतप्रधान मोदी जी , माझे नाव कृती दुबे आहे. मी इयत्ता पहिलीत शिकते. मोदीजी तुम्ही खूप महागाई केली आहे. पेन्सिलनेही रबर महाग केले आहे. आणि मॅगीच्या किमतीही वाढल्या आहेत. आता पेन्सिल मागितली म्हणून आई मला मारते. मी काय करू? इतर मुलं माझी पेन्सिल चोरतात, अशी तक्रार तिने मोदी यांच्याकडे केले आहे.
मुलीचे वडील विशाल दुबे हे पेशाने वकील आहेत. हे पत्र माझ्या मुलीचे 'मन की बात' असल्याचे त्यांनी सांगितले आहे. चिमुकलीचे हिंदीत लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
छिब्रामाऊचे एसडीएम अशोक कुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, या चिमुरडीच्या पत्राबद्दल त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून कळले. मुलीला कोणत्याही प्रकारे मदत करण्यास मी तयार असून तिचे पत्र संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.