व्हायरल VIDEO : राजस्थानात `पाकिस्तान जिंदाबाद`चे नारे
राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला दिसतोय. या व्हिडिओत `पाकिस्तान जिंदाबाद`चे नारे देणारे लोक दिसतायत.
जयपूर : राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला दिसतोय. या व्हिडिओत 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे देणारे लोक दिसतायत.
नागौर जिल्ह्यातल्या डीडवाना भागात एका समुदायाच्या विरोधात आंदोलन करताना पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले गेले. हा व्हिडिओ गुरुवारी नागौरी गेटजवळ झालेल्या आंदोलनादरम्यानचा असल्याचं सांगण्यात येतंय.
परंतु, यावर कोणतीही अधिकारिक पृष्टी झालेली नाही. दुसरीकडे, उत्तरप्रदेशातील बिजनौरमध्ये एका महिलेसोबत झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हे आंदोलन केलं गेल्याचंही म्हटलं जातंय.
अद्याप या व्हिडिओविरुद्ध पोलिसांत कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नाही.