मुंबई : सोशल मीडिया हा कंटेन्टचा भंडार आहे. येथे तुम्हाला असे एक एक व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात, जे तुमचं मनोरंजन करतं. येथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. जसे की, मनोरंजक, क्राफ्ट, सायन्स, वाईल्ड लाईफ, लाईफस्टाईल इत्यादी. सोसल मीडियावर प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडी प्रमाणे कंटेन्ट पाहातो. परंतु या सगळ्यात असा एखादा व्हिडीओ असतो. जो लोकांच्या मनाला स्पर्श करुन जातो आणि अशाच स्पेशॅलिटीमुळे हे व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर एका सापाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पाणी पित आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं. परंतु तुम्हाला हा व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटेल कारण, त्या सापाला एक व्यक्ती आपल्या तळहातावर पाणी घेऊन पाणी पाजत आहे. जे आश्चर्याकारक आहे.


आपण बऱ्याच लोकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांना पाणी पाजताना पाहिलं असेल. लोकं कुत्रे, मांजरी, गाय, बैल यासगळ्यांना तर पाणी पाजतातच. पण सापाला क्वचितच कोणी आपल्या ओंझळीने पाणी पाजलं असेल. कारण साप कधी दंश करेल याचा काही नेम नाही. परंतु असं असुनही या व्यक्तीने त्याला आपल्या तळहातावर पाणी पाजलं.


तसे पाहाता हे एका स्टंट शिवाय कमी नाही. या व्यक्तीने जे सापला पाणी पाजायचं जे धाडस केलंय, त्याला तोड नाही.



आता उन्हाळा जाणवू लागला आहे. अशा काळीत तुम्ही तुमच्या आजुबाजूच्या प्राण्यांना पाणी देण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांच्यासाठी तशी सोय करा.


या व्हिडीओला Susanta Nanda IFS या अकाउंटवरुन ट्वीटरवरती अपलोड करण्यात आलं आहे. 9 मार्चला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडीओला हजारांच्यावर लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडीओ फार आवडला आहे.