केरळ : जगातील सर्वात धोकादायक सांप किंग कोबराचं नाव ऐकल्यानंतरही अनेकांना धडकी भरते. पण या जगात अशी अनेक लोकं आहे ज्यांना सापांची जराही भिती वाटत नाही. केरळमधील 'स्नेक मॅन'च्या नावाने प्रसिद्ध असलेले सुरेश हे देखील अशाच लोकांमधील एक आहे. फेसबुकवर ते बरेच लोकप्रिय आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्नेक मेन' सुरेश यांनी त्यांच्या नावाने एक फेसबूक पेज सुरु केलं आहे. 14 लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे. यावरुनच अंदाज येऊ शकतो की ते किती लोकप्रिय आहेत. त्यांच्या फेसबुक पेजवर ते अनेक सापांशी संबंधित व्हिडिओ शेअर करत असतात. ज्याला लोकांची मोठी पसंती मिळते.


आतापर्यंत पकडले 3 हजार साप, ज्यामध्ये 65 किंग कोबरांचा समावेश


सुरेश यांच्या फेसबुक पेजवरुन हे कळाले की त्यांनी आतापर्यंत 3 हजारांहून अधिक विषारी सापांना पकडले आहेत. या दरम्यान अनेक विषारी सापांनी त्यांना चावलं देखील आहे. पण त्याच्यावर याचा कोणताही परिणाम झाला नाही. सुरेशवे 65 किंग कोबरा सापं देखील पकडले आहेत. जे जगातील सर्वात विषारी साप मानले जातात. कोबराचं एक थेंब विष अनेकांचा जीव घेऊ शकतो.


मीडिया अहवालानुसार, सांपाना पकडण्याच्या कलेमुळे संपूर्ण जगात त्यांना ओळख मिळाली आहे. केरळ सरकारने त्यांना सरकारी नोकरीची ऑफर दिली होती पण त्यांनी ती घेतली नाही. सुरेश म्हणतात की, जर नोकरी करायला लागलो तर समाजातील लोकांची मदत करण्यामध्ये अडचणी येतील.


पाहा असाच एक व्हिडिओ