मुंबई : शुक्रवारपासून सुरू झालेल्या संसदचे शीतकालीन सत्रात लोकसभा महासचिव सुमित्रा महाजन यांनी सुरूवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी देशाच्या पहिल्या महिला लोकसभा महासचिव स्नेहलता श्रीवास्तव यांचा परिचय संसद सदस्यांना करून दिला. स्नेहलता या देशाच्या पहिला महिला आहेत ज्यांनी लोकसभेत महासचिव होण्याचा गौरव प्राप्त केला आहे. ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत आपली सेवा देणार आहेत. 


या अगोदर स्नेहलता यांची नियुक्तीच्या संदर्भात लोकसभा सचिवालयद्वारे एक अधिसूचना जाहीर केली होती. त्यांनी १ डिसेंबरला पदभार स्विकारला आहे. त्यांचा कार्यकाल हा ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत असणार आहे. त्यांनी अनूप मिश्रांनी हे पद सोडल्यानंतर लगेचच तात्काळ दुसऱ्या दिवशी स्विकारले आहे. मिश्रा यांचा हा कार्यकाल ३० नोव्हेंबर रोजी समाप्त झाला होता. 


लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की, महिला महासचिव झाल्या आहेत. या अगोदर रमा देवी या राज्यसभेच्या पहिल्या महिला जनरल सेक्रेटरी होत्या. १९८२ बॅचच्या मध्य प्रदेश काडरच्या स्नेहलता श्रीवास्तव केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या सेक्रेटरी पदावरून निवृत्त झाल्या आहेत. या अगोदर त्या केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालय व नाबार्ड सारख्या ठिकाणी सेवा दिलेली आहे.