श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील खालच्या भागात सततच्या बर्फवृष्टीमुळे स्थानिक लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. तर दुसरीकडे पर्यटकांसाठी मात्र ही बर्फवृष्टी आनंदाची बाब ठरत आहे. काश्मीरच्या पर्वतीय भागात शनिवारपासून 'चिल्ले कलां'ला सुरुवात झाली. हा ४० दिवसांपर्यंत सुरु राहतो. यादरम्यान काश्मीरमध्ये हिमवर्षावची शक्यता सर्वात अधिक असते. तापमानाचा पारही सर्वात खाली जाण्याची शक्यता असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्वतीय भागातील जोरदार बर्फवृष्टीमुळे स्थानिकांच्या समस्या वाढल्या आहेत. उत्तर काश्मीरच्या गुलमर्गमध्ये बर्फवृष्टीनंतर तापमान शून्याहूनही कमी होऊन उणे ९ अंशांवर पोहचलं आहे. श्रीनगरमध्ये तापमान उणे १.४ अंशाहून कमीची नोंद करण्यात आली आहे. 


कुलगाम जिल्ह्यातील उपायुक्तांनी बर्फवृष्टीचा सामना कऱण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं. १२ मशिन सतत राजमार्गावरुन बर्फ हटवण्यासाठी काम करत आहेत. कंट्रोल रुम आणि आपत्ती व्यवस्थापन सेंटरही तयार करण्यात आले आहेत. सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपायुक्तांनी दिली आहे.



जम्मू-काश्मीर राष्ट्रीय राजमार्ग बर्फाने वेढला आहे. बर्फवृष्टीचा वाहतूकीवर परिणाम झाला असून अनेक भागात विजप्रवाह खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने स्थानिक नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत.