चंडीगढ : हिमाचल प्रदेशमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. पर्यटकांनी या बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद लुटला. स्किईंगचा आनंद घेतानांही पर्यटक यावेळी पहायला मिळत आहेत. काश्मीरमध्ये देखील बर्फवृष्टी सुरु आहे. उंच ठिकाणी मोठ्य़ा प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. हवामान खात्यानं लवकरच हवामानात सामान्य होणार असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बनिहाल सेक्टरमध्ये मंगळवारी बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-जम्मू राजमार्ग बंद करण्यात आला होता. श्रीनगर-लेह राजमार्ग आणि मुगल रोड देखील बंद होता. श्रीनगरमध्ये सर्वात कमी 1.6 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. पहलगाममध्ये तापमान शून्य ते 2 डिग्रीच्या दरम्यान आहे तर गुलमर्गमध्ये शून्य ते 7.6 डिग्री तापमान आहे.


लद्दाख क्षेत्रात लेह येथे शून्य ते 6.2 डिग्री, कारगिलमध्ये शून्य ते 7.3 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. जम्मू शहरात तापमान 10.9 डिग्री, कटरा येथे 8 डिग्री, बटोट येथे 1.8 डिग्री, बनिहाल येथे 0.2 डिग्री आणि भदरवाह येथे 2.6 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.


महाराष्ट्रात देखील थंडीचा जोर वाढला आहे. यंदा सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे करण्यात आली. निफाडचं तापमान 7.6 अंशाखाली गेला होता. नगरमध्ये 9.2 तर नाशिकमध्ये 9.4 अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात किमान तापमान 9.5 अंशापर्यंत पोहोचलं आहे. औरंगाबाद आणि जळगाव येथे 10.4 डिग्री तापमानाची नोदं करण्यात आली.