काश्मीर, शिमलामध्ये बर्फवृष्टी, पर्यटकांनी लूटला आनंद
सगळीकडे बर्फाची चादर अंथरल्याचं जणू चित्र आहे.
नवी दिल्ली : काश्मीर, श्रीनगर, शिमला सगळीकडेच सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. या बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी दुसरीकडे पर्यटक याचा आनंदही लुटत आहेत. बर्फवृष्टीनंतर शिमल्याला जाणाऱ्या या टॉय ट्रेनचा नजारा काही औरच होता. झाडांवर, ट्रेनवर सगळीकडे बर्फाची चादर अंथरल्याचं जणू चित्र आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या टॉय ट्रेन हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
दिल्लीमध्ये पुन्हा थंडी वाढली आहे. पुढच्या 2 दिवसात आणखी थंडी वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासात अरुणाचल प्रदेश, उत्तर बंगाल, आसाम, बिहार, मेघालयमध्ये पावसाची शक्यता आहे. 11 आणि 13 फेब्रुवारी दरम्यान हिमाचलमध्ये बर्फवृष्टीची शक्यता आहे.
धुक्यांमुळे दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. विमान वाहतुकीवर देखाल याचा परिणाम पाहायला मिळता आहे. दरवर्षी वाढणारी थंडी आणि उष्णता हे ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्याचा इशारा देत आहे.