मुंबई : फेसबुक (facebook) आणि व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) सारख्या सोशल मीडिया  (Social Media) प्लॅटफॉर्मवरुन आक्षेपार्ह मेसेज शेअर कणाऱ्यांची आता काही खैर नाही. असा संदेश सोशल मीडियावर शेअर करणार्‍या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाऊ शकते. तसे पोलिसांनी संकेत दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी एक अधिसूचना जारी केली आहे. या सूचना जारी करताना म्हटले आहे की, जर कोणतीही व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकवर आक्षेपार्ह सामग्री (जसे की लेख, फोटो, व्हिडिओ आदी.) शेअर किंवा फॉरवर्ड करत असेल तर त्यांच्याविरोधात भारतीय कलम 505/153 ए / 295 ए / 298 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.


इतकेच नाही तर दुसर्‍या जिल्हा किंवा राज्य तसेच देशाची दिशाभूल करणारी सामग्री (जसे की लेख, फोटो, व्हिडिओ आदी.) सामायिक करण्यासाठी एनएसए (NSA) अंतर्गत कारवाई देखील केली जाऊ शकते. कोणत्याही माहिती देण्यापूर्वी त्यांनी सत्यता पडताळणी करावी अशी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.