Boy Struck by a running train Video : सोशल मीडियामुळे (Social Media) अनेकांनी रातोरात पब्लिसिटी मिळवली अन् स्टार झाले. काहींनी बक्कळ पैसा कमवला, त्यामुळे सोशल मीडियामुळे येणारा पैसा पाहून अनेकांनी रीलचा (Reels) नाद धरला. सोशल मीडियावर मनोरंजनासोबत अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. सध्या एक असाच हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ (Shocking video) पाहून तुम्हालाही काळजाचा धोका चुकल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही जर हालक्या काळजाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नका.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे कंटेन्ट पहायला मिळतात. कोणी फिटनेस चॅलेंज चालवतंय तर कोणी भारदस्त बिझनेस आयडिया देताना दिसतं. काहीजण व्हायरल व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (Train Accident Viral Video) एक अल्पवयीन मुलगा रेल्वे रूळावर उभा राहून रील शूट करत असताना दिसतोय. त्याचवेळी मोठा घात झाला अन् मुलाला जीव गमवावा लागला.


उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) हा धक्कादायक व्हिडिओ असल्याचं समोर आलंय. फरमान असं मृत पावलेल्या मुलाचं नाव असून तो जहांगीराबादचा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आलीये. फरमान आपल्या मित्रांसोबत मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो रील शूट करण्यासाठी मित्रांसह रेल्वे रुळावर गेला. रील शूट करण्याच्या नादात तरुणाला काही सुचलं नाही. तो शूट करत राहिला. त्यावेळी त्याच्या कानात इअरबर्डही होते. ट्रेनने मुलाला धडक दिली अन् मुलाचा जागीच मृत्यू झालाय.


पाहा VIDEO



दरम्यान, ट्रेनची धडक इतकी भयंकर होती की, मुलगा काही वेळ हवेत उडाल्याचंही यामध्ये दिसतंय. हा व्हिडीओ पाहून काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी रील स्टार्सला चपराक लगावली आहे. जीव धोक्यात घालून रिल्स न बनवण्याचा सल्ला देखील दिलाय.