ऐकावे ते नवलच ! सॉफ्टवेअर इंजिनिअर घोड्यावरुन ऑफिसला
नोकरीचा शेवटचा दिवस. इंजिनिअर अखेरच्या दिवशी चक्क घोड्यावरुन ऑफिसमध्ये अवतरला.
बंगळुरु : नोकरीचा शेवटचा दिवस प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भावनिक असतो. जुन्या सहकाऱ्यांना निरोप देण्याचा दुःख क्षण आणि नव्या नोकरीचा आनंद अशी काहीशी अवस्था त्या कर्मचाऱ्याची असते. निरोप घेणाऱ्यासाठी त्याचे सहकारी काही सरप्राईजही प्लान करतात किंवा केक कापून सेलिब्रेशन केलं जातं. मात्र बंगळुरुमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या नोकरीचा अखेरचा दिवस हटके पद्धतीने सेलिब्रेट केला. रुपेश वर्मा नावाचा हा इंजिनिअर अखेरच्या दिवशी चक्क घोड्यावरुन ऑफिसमध्ये अवतरला.
यावेळी आपला ऑफिसमधील शेवटचा दिवस आहे अशी पाटीही त्याने घोड्यावर झळकावली होती. रुपेश घोड्यावरुन ऑफिसला आल्याचे पाहून सारेच अवाक झाले. बंगळुरुमधील रिंग रोड परिसरात अॅम्बेसी गोल्फ रिंग या कंपनीत तो काम करत होता. मात्र कंटाळा आल्याने मूळचा राजस्थानचा असलेल्या रुपेशने नोकरीचा राजीनामा दिला. नोकरी सोडल्यानंतर देशासाठी काही तरी करण्याच्या उद्देशाने स्वतःचं स्टार्टअप सुरु करणार असल्याचे त्याने सांगितलंय.