Solar Eclipse Effect On Animal : सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण सोमवारी 8 एप्रिलला आहे. वैज्ञानिकांच्या मते जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी सरळ रांगेत येतात. अशा स्थिती सूर्य चंद्राच्या मागे लपला जातो आणि पृथ्वीवर काही काळासाठी अंधार होतो. तब्बल 50 वर्षांनंतर सूर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर सर्वात अधिक जवळपास 7 मिनिटं अंधार होणार आहे. भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही. या सूर्यग्रहणाचा मानवी जीवनावर परिणाम होतो. तसंच सूर्यग्रहण काळात प्राण्यांच्या व्यवहारात बदल होतो असं आपण ऐकलंय. तुमच्या घरातही पाळीव प्राणी असेल तर सूर्यग्रहणाच्या काळात त्यात तुम्हाला कधी बदल जाणवला का? काय आहे यामागील कारणं, यात काही तथ्य आहे का? याबद्दल अभ्यासक काय म्हणतात जाणून घ्या.(Solar Eclipse 2024 Do owls really talk during Surya Grahan Changes in behavior of animals what the study says unknown facts in marathi)


प्राण्यांचाही असतो एक बायोलॉजिकल क्लॉक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जसं मानवी जीवनानुसार प्राण्यांचाही एक बायोलॉजिकल क्लॉक असतो. विज्ञानामध्ये याला सर्कॅडियन रिदम असं म्हटलं जातं. सूर्यग्रहणामुळे प्राण्यांच्या या दैनंदिन व्यवहारात काही वेळासाठी व्यत्यय येतो. अभ्यासक असं म्हणतात की, सूर्यग्रहण काळात प्राण्यांचा दैनंदिन कार्यावर त्याचा कसा परिणाम होतो हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. कारण सर्व प्राणी या खगोलीय घटनेला सारखेच प्रतिक्रिया देता असं नाही. 


प्राण्यांवर कधी करण्यात आला अभ्यास? 


तब्बल 100 वर्षांपूर्वी न्यू इंग्लंड कीटकशास्त्रज्ञ विल्यम व्हीलर यांनी सूर्यग्रहण काळात प्राण्यांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला, असं बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. 1932 च्या सूर्यग्रहणाच्या वेळी विल्यम व्हीलर एका वृत्तपत्रात जाहिरात देऊन आणि लोकांना आवाहन करुन सांगितलं की, दिवसा सूर्यास्ताच्या क्षणी प्राण्यांचं वर्तन कसं बदते त्यावर लक्ष द्या. 


खरंच सूर्य ग्रहणाच्या वेळी घुबड बोलतात?


विल्यम व्हीलर यांना तब्बल 500 रिपोर्ट मिळाले यामध्ये पक्षी, कीटक, वनस्पती, सस्तन प्राणी, घुबड आणि मधमाश्या यांच्या व्यवहाराबद्दल उल्लेख होता. ते म्हणाले की, सूर्यग्रहण काळात घुबड बोलतात आणि मधमाश्या पोळ्याकडे परत जातात. या गोष्टीत किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी ऑगस्ट 2017 मधील सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञांनी पुन्हा प्रयोग केला. ज्यामध्ये धक्कादायक सत्य समोर आलं. सूर्यग्रहणाने अंधार पडल्यामुळे दक्षिण कॅरोलिना प्राणीसंग्रहालयात कासवांचे मिलन सुरू झाले आणि ओरेगॉन, आयडाहो आणि मिसूरीमधील भंपक मधमाशांनी गुंजणे बंद केली होती. 


प्राण्यांसारखाच वनस्पतीवरही परिणाम होतो का?


सूर्यग्रहण काळात प्राण्यांचा व्यवहारात बदल होतो तसाच काही परिणाम वनस्पतीवरही होतो का? या प्रश्नाच उत्तर जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या 143 हवामान केंद्रांवरील डेटाचा अभ्यास केला, असं एका अहवालात सांगण्यात आलंय. या अभ्यासाचं नेतृत्व स्वीडनमधील लुंड युनिव्हर्सिटीच्या वर्तणुकीशी संबंधित इकोलॉजिस्ट सेसिलिया निल्सन यांनी केलं. ते म्हणतात की, प्रकाशाचा वनस्पतींपासून प्राण्यांपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम होतो. या अभ्यासात त्यांना हवेतील पक्ष्यांची संख्या प्रत्यक्षात कमी दिसून आली. तर सूर्य ग्रहणाच्या वेळी बहुतेक पक्षी आकाशातून खाली आले होते किंवा त्यांनी आकाशात झेप घेतली नाही. 


खरं तर सूर्यग्रहणात प्राण्यांवर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी अनेक अभ्यास करण्यात आले. त्या अभ्यासानुसार प्रत्येक सूर्यग्रहणात सर्व प्राणी एकसारखे वर्तन करत नाहीत. काही अभ्यासानुसार असंही आढळले की, सूर्यग्रहण काळात मासे लपण्यासाठी जागा शोधतात. तर कोळी स्वतःच त्यांचे जाळे नष्ट करतात. त्याचवेळी अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनामधील प्राणीसंग्रहालयात जिराफ घाबरून सैरभैर पळत सुटल्याची नोंद झाली. तर सूर्यग्रहण होताच कासवांमध्ये संबंध ठेवण्यात आल्याचं एका अभ्यासात सांगण्यात आलं.