नवी दिल्ली : सेनाप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सैनिकांनी स्मार्टफोन आणि सोशल मीडिया यांचा वापर करावा किंवा नाही यावरून मंगळवारी स्पष्टीकरण दिलंय. सैनिकांनी जरून स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापर करावा... परंतु, सैन्याच्या शिस्तीत, असं बिपिन रावत यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही सैनिकांना सोशल मीडियापासून दूर राहण्यास सांगावं, अशा पद्धतीचे सल्ले आम्हाला मिळाले होते. पण, तुम्ही एखाद्या सैनिकाला स्मार्टफोनचा वापर करण्यापासून रोखू शकता? जर तुम्ही स्मार्टफोनचा वापर रोखू शकत नाहीत तर त्याच्या वापराची परवानगी द्यावी, हेच योग्य ठरेल... परंतु, या वापरादरम्यान शिस्त असणं गरजेचं आहे, असं बिपिन रावत यांनी म्हटलंय. 


सेनाप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी शत्रूकडून भारताविरुद्ध केल्या जाणाऱ्या सोशल मीडियाच्या वापरावरही प्रतिक्रिया दिलीय.



सोशल मीडियाही इथेच राहील... आमचे सैनिकही याचा वापर करू शकतील... आपले विरोधी आणि शत्रू सोशल मीडियाला आपल्या विरुद्ध मनोवैज्ञानिक युद्ध आणि छळासाठी वापर करतील... आपल्याला याचा वापर आपल्या फायद्यासाठी करावा लागेल, असंही त्यांनी म्हटलंय. 


सध्या सुरू असलेल्या युद्धात माहिती मिळवण्याचं 'युद्ध' महत्त्वपूर्ण आहे.. आणि याअंतर्गत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची चर्चाही सुरू झालीय... आपण आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर आपल्या फायद्यासाठी वापरायचा असेल तर आपल्याला सोशल मीडियाचा वापर करावाच लागेल, असंही त्यांनी म्हटलंय.