भोपाळ: अभिनेता अनुपम खेर यांच्यामते काश्मीर समस्येचा तोडगा काढण्यासाठी कलम ३७० हटवणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितले की देशातील इतर भागातील लोकांना तिथे संपत्ती खरेदी करण्याचा अधिकार असल्यास, शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा अधिकार असल्यास या समस्येचा तोडगा निघणे शक्य होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीरचा फायदा:


इंडिया अशियन युथ समिट मध्ये सहभागी झाल्यावर अनुपम खेर यांनी सांगितले की, ''काश्मीरमध्ये राहणारे देखील आपले बांधव आहेत. त्यामुळे तिथे जावून इतर लोकांना राहण्याचा अधिकार का नाही ? देशातील इतर भागातील लोकांना इतर अन्य ठिकाणी राहण्याची संधी मिळत असल्याने ती संधी काश्मीरमधील लोकांना देखील मिळायला हवी.


समस्येचा तोडगा:


खेर यांनी सांगितले की कलम ३७० हटवला गेल्यास देशातील अन्य भागातील लोकांना तिथे उद्योग मिळेल. तिथे शिक्षण संस्था उभ्या राहतील. त्याचबरोबर संपत्ती खरेदीचा अधिकार मिळाल्यास या समस्येवर तोडगा निघेल. त्याचबरोबर ते म्हणाले की, तेथील लोकांना देखील चांगल्या सुविधा मिळायला हव्यात. चांगले रस्ते, पूल या सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. हे सगळे तेव्हाच शक्य होईल जेव्हा कलम ३७० हटवला जाईल.