राजस्थान : देशावर सध्या कोरोनाचे संकट घोंघावत आहे. हा वाढता धोका पाहता देशातील लॉकडाऊन वाढवण्याची देखील शक्यता आहे. कोणीही घराबाहेर न पडण्याच्या, तसेच हातपाय स्वच्छ धुण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. जनता सध्या कोरोनाच्या दहशतीलखाली आहे. असे असताना काही समाजकंटक असून यात भर टाकत आहेत. राजस्थानमध्ये काही महिलांचे विकृत प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे लोकांमधील कोरोनाची भीती अधिक वाढत चालली आहे. कोटा शहरातील एक सीसीटीव्ही फुटेज पाहुन सर्वच हैराण झाले आहेत. 



काही महिला प्लास्टिक बॅगेत थुंकून ती बॅक घरासमोर टाकण्याचा प्रकार करत होत्या. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शहर पोलीस मनोज सिकवार यांनी हे फोटोस समोर आणले आहेत. हा प्रकार सर्वांच्या लक्षात आल्यानंतर परिसर सॅनिटाईझ करण्यात आला आहे. या महिलाचा शोध घेतला जात आहे. 



राजस्थानमधील कोरोनाग्रस्तांची संख्या ८१५ इतकी झाली आहे. राज्यात २२ मार्चपर्यंत लॉकडाऊन असून ४० ठाणे क्षेत्रात करअफ्यू लागला आहे.