सासू बायकोला सासरी पाठवत नव्हती, नवऱ्याचे डोके सटकले; सासूला थेट गोळ्याच झाडल्या
Man Killed Mother in law: एका व्यक्तीने सासूला थेट गोळ्या झाडल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.
बिहारः जावयाने सासूची निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. पत्नीला सासरी पाठवत नसल्याने जावयाने टोकाचे पाऊल उचलले आहे. बिहारच्या मोतिहारीमध्ये ही घटना घडली आहे.
दरभंगा येथे राहणाऱ्या छोटन साह नावाच्या व्यक्तीचे लग्न कुण्डवा चैनपुर क्षेत्रात जतवालिया येथे राहणाऱ्या राजकिशोर शाह यांच्या मुलीसोबत झालं होतं. लग्न होऊनही त्याची पत्नी त्याच्यासोबत राहण्यास तयार नव्हती. त्याने तिला हरतर्हेने समजवण्याचा प्रय़त्न केला. पण ती ऐकायला तयारच नव्हती. तर, पत्नीची आई म्हणजेच त्याच्या सासूबाईदेखील मुलीला सासरी पाठवायला तयार नव्हती.
रविवारी रात्री आरोपी त्याच्या सासरी आला आणि बाहेरच्या पायऱ्यांच्या सहाय्याने घरात आला होता. त्यानंतर तिथे त्याचा पत्नीसोबत वाद झाला होता. पत्नी त्याच्यासोबत जाण्यास तयार नव्हती त्यावरुन त्यांच्यात मोठा वाद झाला होता. त्याचवेळी त्याची सासू तिथे आली. तिने ही तिला सासरी पाठवण्यास नकार दिला.
दोघांमधील वाद वाढल्यानंतर जावयाने त्याची बंदूक काढून सासूवर गोळ्या झाडल्या त्यानंतर घटनास्थळावरुन फरार झाला. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते.
वाचाः तरुणीवर चाकुने ४० वार, नंतर दगडाने ठेचून ठार केले, दिल्लीत भररस्त्यात थरार
दरम्यान, आरोपीवर २०१८ साली त्याच्या आईची हत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणी जावई आणि त्याच्या पत्नीवरही हत्येचा गुन्हा नोंद आहे. म्हणूनच त्याची पत्नी त्याच्यासोबत राहण्यास तयार नव्हती. इतकंच नव्हे तर, श्यामवर त्याच्या सख्ख्या बहिणीवर जीवघेणा हल्ला केल्याचाही आरोप आहे. दरभंगामध्ये त्याच्यावर दोन्ही घटनेप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर, यापूर्वीही आरोपीने त्याची पत्नी आणि सासू गायत्री देवी यांच्यावर हल्ला केला होता.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी हजर झाले आहेत. प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मयत गायत्री देवी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपीविषयी बोलताना पोलिसांनी सांगितले आहे की, त्याने यापूर्वीही त्याच्या आईची हत्या केली होती. पोलिस आरोपीचा शोध घेत असून लवकरच त्याला अटक करु, असा दावा त्यांनी केला आहे.
पुणे हादरले! लिव्ह इन पार्टनरसोबत अमानुष कृत्य, तरुणीकडून बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या
दिल्लीत थरारक घटना
दिल्लीत थरारक घटना घडली आहे. १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची भररस्त्यात चाकने भोसकून हत्या करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर मुलीवर तब्बल २० ते ४०वेळा चाकूने वार करण्यात आले व त्यानंतर तिच्या डोक्यात चारवेळी दगडही घातले. या घटनेने संपूर्ण देशात एकच खळबळ माजली असून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी साहिलला अटक केली आहे. या घटनेचा सीसीटिव्ही व्हिडिओ समोर आला आहे.