Sonali Phogat Death Case Latest Update:  सोनाली फोगाट 22 ऑगस्ट रोजी PA सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी यांच्यासोबत गोव्याला गेली होती. मंगळवारी सकाळी पोलीस आणि तिचा PA सुधीर यांनी सोनालीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचं माध्यमांना सांगितलं. मात्र सोनालीचे कुटुंबीय ही हत्या असल्याचा सुरुवातीपासुन आरोप करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

42 वर्षीय टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनालीच्या मृत्यूनंतर आता दररोज याबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. सोनालीच्या मृत्यूनंतर तिचा भाचा सचिन याचं PA सुधीर सांगवान सोबत फोनवरून बोलणं झालं. आता त्याचीच ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे. या संभाषणात सचिन याने घटनेबाबतचा आढावा घेतल्याचं समजतंय. एका हिंदी संकेतस्थळावर याबाबतची बातमी प्रसिद्ध झाली आहे. 


समोर आलेल्या ऑडिओमध्ये सुधीर सांगवान (सोनालीचा PA) आणि सोनालीच्या भाचा एकमेकांशी बोलत आहेत. त्यांच्यात काय चर्चा  झाली ? वाचा


  • सचिन- हॅलो, सचिन बोलतोय 

  • सुधीर सांगवान- हा, सचिन 

  • सचिन- तिथेच आहात का आता? 

  • सुधीर सांगवान- हो, गोव्यात आहे भाई

  • सचिन- पोस्टमार्टम झालं का? 

  • सुधीर सांगवान- पोस्टमार्टम संध्याकाळी किंवा उद्या होईल 

  • सचिन- अच्छा! संध्याकाळी की उद्या, हे असं कसं झालं? 

  • सुधीर सांगवान- माहित नाही भाई कसं झालं. मला तर तर काहीच समजत नाहीये.

  • सचिन- अच्छा! तुम्ही तिथेच होतात का, सोबतच. जवळच.

  • सुधीर सांगवान- मग काय, पूर्ण रात्र आम्ही एकमेकांशी आनंदाने गप्पा मारल्या

  • सचिन- हम्म 

  • सुधीर सांगवान- आणि सकाळी 7.00-7:30 वाजताची घटना. मी 5 ते 7 मिनिटं एका कामासाठी खोलीबाहेर गेलो होतो. तेवढ्यात झालं 

  • सचिन- अच्छा अच्छा. पोस्टमॉर्टम संध्याकाळी होणार की उद्या? गोव्याला कधी गेलात तुम्ही?

  • सुधीर सांगवान- काल आलो

  • सचिन- अच्छा, काल गेलात  

  • सुधीर- हो 

  • सचिन- चला, ठीक आहे


सोनालीच्या मृत्यूनंतर तिचे कुटुंबीय ही हत्या असल्याचा आरोप करत आहेत. सोनालीच्या शवविच्छेदन अहवालात आणि CCTV फुटेजमधूनही मोठे गौप्यस्फोट होताना पाहायला मिळत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी गोव्यातील कारली क्लबच्या मालकाला ताब्यात घेतलं आहे. यासोबतच पोलिसांनी क्लबमधील वॉशरूममधून ड्रग्स हस्तगत केले आहेत. 


sonali phogat case latest news audio clip of sachin and sudhir sangwan leaked conversation