रामराजे शिंदे, नवी दिल्ली : युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २२ मे रोजी  विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी देखील या बैठकीत सहभागी होणार आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार, अजित पवार तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. १७ विरोधी पक्ष या बैठकीला हजर राहणार असून सपा आणि बसपाचे नेते उपस्थित राहणार की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामगार कायदा सुधारणा, स्थलांतरीत मजूर आणि फेरीवाले या तीन मुद्दयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी १७ पक्षांनी सहमती दर्शविली आहे. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी या देखील उपस्थित राहणार आहेत.


भाजपशासित राज्यांकडून कामगार कायद्यात बदल केले जात आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात सरकारने कामगार कायद्यात सुधारणा करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे कामगार कायदा आणि स्थलांतरीत मजूर आणि फेरीवाल्यांच्या समस्या या तीन मुद्द्यांवर सोनिया गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समविचारी पक्षांसोबत चर्चा करणार आहेत.


काँग्रेसचा कामगार कायद्याबद्दलचा आरोप?


- कामगारांचे दिवसाचे आणि आठवड्याचे कामाचे तास वाढविले जाणार.
- कामगारांना आपल्या अधिकारासाठी कोर्टात जाता येणार नाही.