नवी दिल्ली :  केंद्रातील मोदी सरकार सूड भावनेने काम करत आहे. हूकूमशीही पद्धतीनं हे सरकार सत्तेच्या अहंकारात मदमस्त झाल्याची टीका यावेळी माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली.


 बलिदानासाठी सज्ज व्हा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाला नवी दिशा देण्यासाठी सर्व प्रकरच्या  बलिदानासाठी सज्ज व्हा, अशा शब्दात आज सोनिया गांधींनी कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला. 


काँग्रेसचं 84 वं राष्ट्रीय अधिवेशन


दरम्यान, अध्यक्षपद स्वीकारल्यावर राहुल गांधींच्या नेतृत्वात आज दिल्लीतल्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये काँग्रेसचं 84 वं राष्ट्रीय अधिवेशन सुरू झालं. या अधिवेशनात सकाळी राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 



राहुल गांधींनीही सकाळी मोदी सरकार समाजात तेढ निर्माण करत असल्याचं आपल्या छोटे खानी भाषणात सांगितलं.  यानंतर रविवारी दुपारी राहुल गांधी समारोपाचं भाषण करणार आहेत. 


त्यानंतर दुपारी तीन वाजता सोनिया गांधींनीही विद्यमान सरकारवर तोंडसुख घेतलं. मोदी सरकार सूड भावानेनं काम करतंय. हूकूमशीही पद्धतीनं हे सरकार सत्तेच्या अहंकारात मदमस्त झाल्याची टीका यावेळी सोनिया गांधींनी केलीय.


झी २४ तास LIVE अपडेट


15:34 PM
नवी दिल्ली : देशाला नवी दिशी द्यायची असेल तर बलिदानासाठी तयार राहा, असा सल्ला सोनिया गांधी यांनी पक्ष कार्यकार्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिला
15:26 PM
नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष ढासळ होता म्हणून राजकारणात आले, काँग्रेसचे अध्यक्षपद स्विकारले, लोकसभा निवडणुकीत पुन्हा दिशा मिळेल, काँग्रेस हा एक विचार आहे - सोनिया गांधी
15:25 PM
नवी दिल्ली : सत्तेच्या अहंकारापुढे काँग्रेस कधीही जुकणार नाही असे सांगत मोदीचे सरकार हे अहंकाराचे आहे. हे लोकशाहीला घातक आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी यावेळी केली
15:23 PM
नवी दिल्ली : राजकारणात येण्याची माझी कधीच इच्छा नव्हती. काँग्रेस पक्षातील लोकांच्या भावनेचा आदर करून मी नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला - सोनिया गांधी
15:22 PM
नवी दिल्ली : काँग्रेसचे दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी मार्गदर्शन करताना सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला