Sonia Gandhi Dance with Farming women: काही दिवसांपूर्वी युपीएच्या प्रमुख सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी शेतात भातलावणी केल्याचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला होता. त्यावेळी सोनिया गांधी यांनी या महिलांना जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. अशातच सोनिया गांधी यांनी स्वत: गाडी पाठवून या महिलांना जेवणासाठी बोलवून घेतलं. त्याचा एक व्हिडीओ (Sonia Gandhi Dance Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. यामध्ये सोनिया गांधी मनमुराद नाचत असल्याचं दिसत आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन दिवसांपूर्वी राहुल गांधी (Rahul Gandhi) अचानक एका गावात पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी तेथील महिलांना पुन्हा जेवणाचं आमंत्रण दिलं. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या शब्दाचा मान राखला आणि आमंत्रण स्विकारलं. राहुल गांधी यांनी खास बसचं आयोजन केलं आणि यांना आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित केलं. महिलांनी राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यासह जेवणाचा आस्वाद घेतला. 


सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रियंका गांधी महिलांशी गळाभेट घेताना दिसत आहेत, त्यावेळी प्रियांका गांधी यांनी सर्व महिलांचा पाहुणचार केला. राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सोनिया गांधी हरियाणवी गाण्यावर महिलांसोबत ठेका धरताना दिसत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर केला जातोय.


पाहा Video



काय म्हणाले राहुल गांधी?


हरियाणातील सोनीपतमध्ये मी संजय मलिक आणि तस्बीर कुमार या दोन शेतकरी बांधवांना भेटलो. ते बालपणीचे चांगले मित्र आहेत, जे अनेक वर्षांपासून एकत्र शेती करत आहेत. गावातील महिला शेतकऱ्यांनी त्यांना आपल्या कुटुंबाप्रमाणे प्रेम आणि आदर दिला आणि त्यांना घरच्या भाकरी खाऊ घातल्या, असं म्हणत राहुल गांधी यांनी भावना व्यक्त केल्या. भारतातील शेतकरी प्रामाणिक आणि समजूतदार आहेत. शेतकऱ्यांना त्यांची मेहनत माहीत आहे आणि त्यांचे हक्क देखील ओळखले आहेत. गरज पडेल तेव्हा ते काळ्या कायद्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहतात, सोबतच एमएसपी आणि विम्याची योग्य मागणीही करतात. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांचा दृष्टिकोन समजून घेतला, तर देशातील अनेक समस्याही सुटू शकतात, असा विश्वास देखील राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.