रायबरेली : काँग्रेसचा प्रमुख बालेकिल्ला रायबरेली मतदारसंघ. याच मतदारसंघातून इंदिरा गांधी यांनीही निवडणूक लढविली. आता त्यांची सून सोनिया गांधी या निवडणूक लढवत आहेत. त्या याच मतदारसंघातून विद्यमान खासदारही आहेत. आज जोरदार शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी काँग्रेसच्यावतीने भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेसचा तिरंगा होतात. मात्र, त्याशिवाय दोन अन्य झेंडेही फकडताना दिसत होते. त्यामुळे या दोन झेंड्यांचीच जास्त चर्चा सुरु झाली आहे. हे दोन झेंडे कशासाठी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचे नेमकं कारण काय, अशी विचारणा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



लोकसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात मतदान झाले. त्याचवेळी दुसरीकडे निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. आज काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रायबरेली या आपल्या पारंपारिक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. सोनिया गांधी या रोड शो करत अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या. याचवेळी काँग्रेस समर्थकांनी गर्दी केली होती. या गर्दीमध्ये काँग्रेसच्या झेंड्यांसोबत अन्य दोन रंगाचे झेंडेही फडकताना दिसत होते. यात एक निळ्या रंगाचा करत दुसरा झेंडा काळ्या रंगाचा होता.



या झेंड्यांबाबत अनेकांना उत्सुकता होती. याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी सांगितले, निळ्या रंगाचा झेंडा काँग्रेसच्या ‘न्याय’ योजनेचा असून दुसरा काळ्या रंगाचा झेंडा 'राफेल'विरोधात आवाज उठवण्यासाठी आहे. काँग्रेसने जाहीनाम्यामध्ये न्याय योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे. या योजनेद्वारे ५ कोटी गरीब कुटुंबाला वर्षाला ७२ हजार रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने केले आहे. तसेच राफेल विमान घोटाळा प्रकरणी काँग्रेसने रान पेटवले आहे.