सोनिया गांधींचा 20 महिन्यानंतर रायबरेलीच्या दौरा
सोनिया गांधी मोठ्या अंतरानंतर मतदारसंघात
नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी जवळपास 2 वर्षानंतर आज आपल्या मतदारसंघात पोहोचल्या आहेत. या दौऱ्या दरम्यान सोनिया गांधी लोकांना भेटणार आहेत आणि मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेणार आहे. प्रकृती अस्वस्थामुळे सोनिया गांधी रायबरेलीचा दौरा करु शकल्या नव्हत्या.
सोनिया गांधी रायबरेलीचा दौरा त्या वेळी करताय जेव्हा 21 एप्रिलला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह रायबरेलीत एका कार्यक्रमासाठी येणार आहेत.