काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल, मल्लिकार्जुन खरगे यांना प्रभारी पदावरूनही हटवले
काँग्रेस कार्यकारिणीत पुनर्गठन करताना मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. नाराजीचं पत्र लिहिणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना महासचिव पदावरून डच्चू देण्यात आलाय.
नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणीत पुनर्गठन करताना मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. नाराजीचं पत्र लिहिणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना महासचिव पदावरून डच्चू देण्यात आलाय. तर मल्लिकार्जुन खरगे यांनाही महासचिवपदासह महाराष्ट्राच्या प्रभारीपदावरूनही हटवण्यात आलंय. त्यांच्याऐवजी आझाद आणि आनंद शर्मा यांना स्थान देण्यात आले आहे.
काँग्रेस कार्यकारिणीचं पुर्नगठन करण्यात आले आहे. गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांचे कार्यकारिणीत स्थान कायम आहे. आझाद आणि शर्मा यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहले होते. त्यांनी जाहीरपणे पक्षासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. यावरून कार्यकारीणी बैठकीत मोठा गदारोळ झाला होता. तसेच जितिन प्रसाद यांची काँग्रेसने पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेस पक्षातील वादग्रस्त पत्रावर सह्या करणाऱ्या नेत्यांमध्ये जितिन प्रसाद यांचा समावेश होता.
या यादीतून अंबिका सोनी आणि मोतीलाल व्होरा यांना देखील काँग्रेस पक्षाने डच्चू दिला आहे. या फेरबदलात काँग्रेसला सल्ला देणाऱ्या उच्चस्तरीय सहा सदस्यीय विशेष समितीत सुरजेवाला यांचा समावेश करण्यात आहे आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, तसेच मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिव पदावरून हटवण्यात आले आहे. गुलामनबी आझाद हे हरियाणाचे प्रभारी होते. तर, अजय माकन आणि रणदीर सुरजेवाला यांच्या नावांचा समावेश काँग्रेसच्या महासचिव पदांच्या यादीत करण्यात आला आहे. काॅंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सहाय्य करण्यासाठी सहा जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
१. ए के ॲंटोनी
२. अहमद पटेल
३. अंबिका सोनी
४. के सी वेणुगोपाल
५. मुकूल वासनिक
६. रणदीप सिंह सुरजेवाला