साऊथ सुपर स्टारने इतिहास घडवलाः लोकसभा, विधानसभेला जेवढ्या जागा लढवल्या, सर्व जिंकल्या!
South Actor Pawan kalyan: आंध्र प्रदेशमध्ये 21 जागांवर निवडणूक लढवली.
South Actor Pawan kalyan: अभिनय क्षेत्रात ठसा उमटवल् राजकारणात यश मिळवणाऱ्यांची संख्या उल्लेखनीय आहे. कंगना रणौतने हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून लोकसभा निवडणूक जिंकली. आता खासदार अशी तिची ओळख बनली आहे. दरम्यान एक अभिनेता असाही आहे, ज्याने केवळ राजकारणात प्रवेशच केला नाही तर स्वत:चा पक्ष बनवून सर्व उमेदवार जिंकवून देखील आणले.
अभिनेता-राजकारणी पवन कल्याण याच्याबद्दल आपण बोलतोय. आंध्र प्रदेशमध्ये त्याच्या अभिनयाचा मोठा चाहता वर्ग आहे. तुम्ही देखील त्याचे अनेक सिनेमा पाहिले असतील. दरम्यान त्याने 10 वर्षांपुर्वी जनसेना पक्षाची स्थापना केली. आंध्र प्रदेशमध्ये 21 जागांवर निवडणूक लढवली. विशेष म्हणजे त्याने सर्वच्या सर्व 21 जागा निवडूनदेखील आणल्या. जनता सेना पक्ष (JSP) ने तेलगू देसम पक्ष आणि भारतीय जनता पक्षासोबत युती करून निवडणूक लढवली.
पवन कल्याणच्या जनता सेना पक्षाने युतीमधून 21 जागा लढवल्या होत्या. या निवडणूकीत जेएसपीचा प्रभावशाली स्ट्राइक रेट पाहायला मिळाला. 2019 मध्ये त्याच्या पक्षाने 137 जागांवर निवडणूक लढवली होती. पण त्यावेळी फक्त एक जागा निवडून आली होती. बाकी सर्व ठिकाणी त्याला पराजय पत्करावा लागला होता.
पवन कल्याणने काकीनाडा जिल्ह्यातील पिथापुरम मतदारसंघातून निवडणूक लढवली. यात त्याला 1 लाख 34 हजार 394 मतांनी विजय मिळवता आला. त्याने वायएसआरसीपीच्या वंगा गीता यांचा पराभव केला. पवन विरुद्ध लढणाऱ्या गीता यांना अवघी 64 हजार 115 मते मिळाली. पिठापुरम हा कापू मतदारांचा लक्षणीय मतदार असलेला मतदारसंघ आहे, पवन कल्याण आणि वंगा गीता हे दोघेही त्या समुदायाचे आहेत.
JSP चे लोकसभा उमेदवार वल्लभनेनी बालशौरी आणि तंगेला उदय, ज्यांनी अनुक्रमे मछलीपट्टणम आणि काकीनाडा मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्यांनीही विजय मिळवला. ते अनुक्रमे 2 लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले.
पत्नीने ओवाळली आरती
विजयानंतर पवन कल्याणची पत्नी अन्ना लेझनेवाने आरती ओवाळून स्वागत केले. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. पवन कल्याणचे सर्व फॅन्स हा व्हिडीओ रिट्विट करत आहेत. पवनचा भाऊ चिरंजीवी आणि भाचा अल्लू अर्जून यांनीदेखील आपला आनंद व्यक्त केलाय.