मुंबई : केरळमध्ये मान्सून वेळेआधी धडकणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शिवाय अंदमान समुद्रात तीव्रता येण्याची शक्यता देखील आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी सांगितले की, मान्सून 27 मे ते 2 जून दरम्यान केरळमध्ये पोहोचेल आणि येत्या दोन आठवड्यात ते राज्यभर सक्रीय होईल. हवामान खात्याने यापूर्वी मॉन्सून वेळेपूर्वी केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या अंदाजानुसार अंदमान बेटांवर आज मान्सूनच्या सरी बरसतील. त्यानंतर मान्सूनचा प्रवास सुरु होते केरळमध्ये ३१ मे पर्यंत येईल अर्थात मान्सून वेळेआधी केरळमध्ये दाखल होईल असं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे 24 मे पर्यंत मान्सूनचं रूपांतर  चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे.  26 मे रोजी सकाळी चक्रीवादळ उत्तर बंगालच्या उपसागरात ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर पोहोचेलं असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. 


मान्सून साधारणत: 1 जूनला केरळात दाखल होतो. गेल्या आठवड्यात हवामान खात्याने सांगितले होते की 31 मेपूर्वी मॉन्सून केरळमध्ये दाखल होवू शकेल. भारतीय मान्सून प्रदेशात, मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस हा दक्षिण अंदमान सागरातून पडतो आणि त्यानंतर मान्सूनचे वारे वायव्य दिशेने बंगालच्या उपसागराकडे वळतात. यावर्षी मान्सून सामान्य राहील, असा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तविला आहे. यावर्षी पश्चिम किनारपट्टीवर झालेल्या चक्रीवादळ तुफानानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये 'यास' वादळाची शक्यता आहे.