थंडीपासून गाईंचा बचाव करण्यासाठी यूपी सरकारचा `हा` निर्णय
यूपी सरकारने यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतलाय.
नवी दिल्ली : बदलत्या वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम गरीब आणि प्राण्यांवर पडतो. थंडीच्या दिवसात गरीबांची व्यवस्था करण्यासाठी सरकार किंवा स्थानिक प्रशासनातर्फे शेल्टरची व्यवस्था केली जाते. पण प्राण्यांसाठी कोणती व्यवस्था होताना दिसत नाही. यूपी सरकारने यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतलाय.
उत्तर प्रदेश सरकारने(Uttar Pradesh Government)उघड्यावर फिरणाऱ्या गायींना थंडीपासून वाचण्यासाठी एक पाऊल उचललंय. राज्यातील गायींचा थंडीपासून बचाव होण्यासाठी विशेष कोट मिळणार आहेत.
पशुविभागाची जबाबदारी
राज्याच्या पशुपालन विभागाने (Animal Husbandry Department) विविध जिल्ह्यातील पशु चिकित्सक अधिकाऱ्यांना यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. थंडीच्या (winter season) दिवसात राज्यातील गोशाळांमधील गायींना थंडीपासून योग्य उपाय करावेत असेही सांगण्यात आलंय.
ज्यूटने बनणार कोट (Jute Coats for Cows)
शासनाच्या निर्देशानंतर पशुपाल विभागाचे अधिकारी गायींना ज्यूटपासून बनवलेले कोट बनवण्याची तयारी करत आहेत. यामुळे गाईंना थंडी लागणार नाही. थंड हवा आत शिरु नये म्हणून गोशाळेला मोठ्या पॉलीथीनच्या पडद्याने झाकलं गेल्याचे सांगण्यात येतंय.
मोठे पडदे आणि कव्हर बनवण्यासाठी जूटच्या थैल्यांना एकत्र शिवले जाते. गाईचा कोट बनवण्यासाठी या पिशव्यांचा वापर केला जातो. थंडीमध्ये उबदार वाटण्यासाठी गाईंवर हा कोट पांघरला जातो. यासाठी जिल्हा पुरवठा विभाग ज्यूट बॅगची पूर्तता करणार आहे.
गावात पशुशाळा (Cow shelters in Gram Panchayat)
अयोध्येमध्ये गाईंना थंडीपासून वाचण्यासाठी पशुशाळांची (cow shelters) व्यवस्था करण्यात आलीय. गावात उघड्यार फिरणाऱ्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांना चारा मिळावा यासाठी ही पशुशाळा आहे. ग्राम पंचायतीच्या देखरेखीखाली हे काम सुरु आहे. पशु चिकित्सा विभाग गाईंच्या आरोग्याची काळजी घेतो आणि नियमित तपास, उपचार करतो. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) स्वत: वेळोवेळी या पशुशाळेंची तपासणी करतात.