तेलंगाणा : एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असुद्दीन ओवैसी यांचे बंधु आमदार अकबरुद्दीन ओवैसीला (Akbaruddin Owaisi) न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने अकबरुद्दीनची वादग्रस्त भाषण प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष न्यायलयाने मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी झाली. त्यानंतर हा निर्णय 13 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. (special sessions court mp and mla acquitted aimim leader akbaruddin owaisi in 2 hate speech cases pertaining to nirmal and nizamabad district)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकबरुद्दीन ओवैसीने डिसेंबर 2012 मध्ये निजामाबाद आणि निर्मल येथे वादग्रस्त भाषण केलं होतं. अकबरुद्दीन या वादग्रस्त भाषणाप्रकरणी  मंगळवारी न्यायालयात हजर झाले. एका समुदायाविरुद्ध जाहीर सभेत प्रक्षोभक आणि द्वेषपूर्ण भाषण केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध आयपीसी कलमांतर्गत द्वेषपूर्ण भाषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


नक्की प्रकरण काय?


याआधी अकबरुद्दीन विरुद्ध 8 डिसेंबर 2012 ला निजामाबाद जिल्ह्यात आणि 22 डिसेंबर 2012 रोजी निर्मल शहरामध्ये 'द्वेषपूर्ण भाषण' प्रकरणी  एफआयआर दाखल करण्यात आला होता. 


निर्मलमध्ये ओवैसीने दोन समाजात तेढ निर्माण होईल, असं वादग्रस्त भाषण केलं होतं. 15 मिनिटं पोलिसांना रस्त्यावरून हटवण्याबद्दल अकबरुद्दीने वक्तव्य केलं होतं. त्या वेळेस ओवैसी जातीय संघर्षावर बोलत असल्याचा आरोप करण्यात आला. जानेवारी 2013 मध्ये त्याला याच प्रकरणात अटक करण्यात आली होती, मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.


यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने 2016 मध्ये निजामाबाद प्रकरणात तपास पूर्ण केला. त्यानंतर आरोपपत्र दाखल केले होते. त्याचवेळी, याच वर्षी जिल्हा पोलिसांनी निर्मल प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं होतं. निजामाबाद प्रकरणात 41 साक्षीदार, तर निर्मलच्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात 33 साक्षीदार हजर झाले.