मुंबई : आजही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात सणावारांना प्रवासी रेल्वेने अधिक प्रवास करतात. पुढच्या महिन्यात असणाऱ्या दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त रेल्वे प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या सुट्यांच्या दिवसात रेल्वे तिकिट आणि रिझर्वेशनमध्ये प्रवाशांचे खूप हाल होतात. याकरता रेल्वेने खास सोय केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेने 28 स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही ट्रेन 25 ऑक्टोबरपासून सुरू देखील झाली आहे. मुंबई, दिल्ली आणि यूपी - बिहार येण्या जाण्या करता स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. 24 स्पेशल ट्रेनचा रूट आणि त्यांची वेळ आधीच निश्चित करण्यात आली आहे. आताच्या या सणात 52 ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 


यामध्ये सियालदह - अजमेर एसी विकली (02263/02264) , दिल्ली-दरभंगा (05277/05278),  ट्रेन नंबर 02365/02366 पटना-आनंद विहार टर्मिनल सुपरफास्ट,  ट्रेन नंबर 02597/02598 गोरखपुर-मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल या स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत.