पटणा : स्पाइस जेट विमानाचं उड्डाण झाल्यानंतर काही मिनिटांत इमरजन्सी लँण्डिग करण्यात आलं आहे. विमानाच्या इंजिनमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पटणा विमानतळावर विमानाचं इमरजन्सी लँण्डिग करावं लागलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विमानात 185 प्रवासी होते. या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रवासी सुखरुप आहेत. इंजिनमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच तत्काळ लँण्डिग करण्यात आलं. 


पटणाच्या  जयप्रकाश आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने 12.10 मिनिटांनी टेक ऑफ केलं. त्यानंतर काही मिनिटांत विमानाच्या पंख्याला आग लागली. ही आग खाली असलेल्या लोकांना दिसली.  


विमानाच्या पंख्यातून आगीच्या ज्वाळा निघताना लोकांना दिसल्या. लोकांनी तत्काळ या घटनेची माहिती पाटणा पोलिसांना दिली. त्यानंतर या घटनेची माहिती विमानतळावर देण्यात आली. ही माहिती मिळताच विमानाचं इमरजन्सी लँण्डिग करण्यात आलं.