गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ६८८९८ नवे रुग्ण
कोरोनामुळे देशातील ५४,८४९ लोकांना जीव गमवावा लागला आहे.
नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ६८,८९८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९८३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २९,०५,८२४ इतका झाला आहे. यापैकी ६,९२,०२८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशातील २१,५८, ९४७ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. परंतु, कोरोनामुळे देशातील ५४,८४९ लोकांना जीव गमवावा लागला आहे.
भारतातील 'या' शहरात सांडपाण्याची चाचणी; सहा लाख नागरिकांना कोरोना झाल्याचा अंदाज
गेल्या दोन आठवड्यांत कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा स्थिरावताना दिसत होता. दररोज आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा ६० हजारापर्यंत मर्यादित होता. मात्र, काल आणि आज नव्या रुग्णांच्या आकड्याने पुन्हा एकदा ६५ हजारांची वेस ओलांडली आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या १३,१६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ३४६ जणांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक १४,४९२ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ३२६ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या संख्येत पुण्याने मुंबईला मागे टाकलं आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.३७ टक्के झाले असून मृत्यूदर ३.३२ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत ३४,१४,८०९ जणांची टेस्ट झाली असून त्यातील ६,४३,२८९ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.