आध्यात्मिक गुरु जया किशोरी (Spiritual orator Jaya Kishori) आपल्या वेगवेगळ्या व्हिडीओंमुळे नेहमीच चर्चेच असतात. कधी त्या एखादा उपदेश करताना दिसतात, तर कधी आयुष्य जगण्याची कला शिकवताना दिसतात. याचदरम्यान एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. विमातळावर कॅमेऱ्यात कैद झालेल्या जया किशोरी यांच्याकडे 2 लाखांची बॅग दिसल्यानंतर त्या टीकेच्या धनी झाल्या. 29 वर्षीय जया किशोरी Dior ची Book Tote बॅग वापरत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान या टीकेवर आता जया किशोरी यांनी भाष्य केलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रोलिंगवर भाष्य करताना जया किशोरी म्हणाल्या की, "मी एक सर्वसामान्य मुलगी एका सामान्य घरात माझ्या कुटुंबासह राहते. मी तरुणांनादेखील हेच सांगत असते की, तुम्ही मेहनत करायला हवी, पैसे कमवायला हवेत, स्वत:साठी चांगलं आयुष्य निर्माण केलं पाहिजे आणि आपली स्वप्नं पूर्ण करायला हवीत". जया किशोरी यांनी दावा केला आहे की, त्यांची डायर "बुक टोट", जरी अत्यंत मूल्यवान असली तरी एक कस्टमाईज आयटम आहे, जो स्पष्टपणे कोणत्याही चामड्याशिवाय बनवलेला आहे.


"ही एक कस्टमाईज बॅग आहे. यामध्ये कोणतंही चामडं वापरण्यात आलेलं नाही. कस्टमाईज म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे ती बॅग तयार केली जाते. यामुळे त्यावर माझं नावही लिहिण्यात आलेलं आहे. मी कधीच चामड्याचा वापर केलेला नाही आणि करणारही नाही. जे माझ्या कथेसाठी येतात त्यांना चांगलंच माहिती आहे की, मी कधीही हे सर्व मोहमाया आहे असं सागत नाही. पैसे कमवू नका किंवा सगळं सोडून द्या असं मी बोलत नाही," असा दावा जया किशोरी यांनी केला आहे. 



फोटो व्हायरल झाल्यानंतर, त्यांच्या अनुयायांनी भौतिक संपत्तीपासून अलिप्तपणाचे समर्थन करणारी आध्यात्मिक उपदेशक म्हणून तिच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एक्सवरील एका युजरने पोस्ट केली की, "आध्यात्मिक उपदेशक जया किशोरी यांनी त्यांचा व्हिडिओ हटवला आहे ज्यामध्ये त्या 2,10,000 किमतीची डायर बॅग घेऊन गेल्या होत्या. तसे, ती स्वत: गैर-भौतिकवादाचा प्रचार करते आणि स्वतःला भगवान कृष्णाची भक्त म्हणते".


आपल्यावर टीका करणाऱ्या पोस्ट्सला उत्तर देताना जया किशोरी म्हणाल्या, "मी संन्यास घेतलेला किंवा कोणताही त्याग केलेला नाही, मग मी तुम्हाला तसं कसं सांगू? मी पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे की मी संत, साधू किंवा साध्वी नाही". आध्यात्मिक गुरु जया किशोरी (Spiritual orator Jaya Kishori) यांची सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड फॉलोअर्स आहेत. फक्त इंस्टाग्रामवर त्यांचे 12.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.