मेष : आज नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. पण कमी पगार मिळण्याचा योगही बनून राहील. कोणाला प्रपोज करण्यासाठी वेळ चांगला आहे पण विचारपूर्वकच सर्वकाही करा. जुने आजारपण डोकं वर काढू शकते. ऑफिसमधील काहीजण तुमच्यापासून माहिती लपवण्याचा प्रयत्न करतील. गुंतवणूकीच्या योजना आखू शकता. काही ठरवलेली काम पूर्ण करण्यासाठी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृष : कोणतीही गुंतवणूक विचार पूर्वकच करा. देवाणघेवाण आणि गुंतवणूक करताना काळजी घ्या. आज वृष राशी वाल्यांचे लक्ष कामधंद्यात नसेल. कोणतीतरी लपवलेली गोष्ट अचानक समोर येण्याची चिन्हं आहेत. तुम्हाला दिवसभर सतर्क राहून काम करावे लागेल. शनि-चंद्रामुळे तुमचे साठवलेली रक्कम खर्च होऊ शकते. यामुळे तुमची काम बिघडण्याचीही शक्यता आहे. जखम, मुरगळणे यासारखे त्रास होऊ शकतात. गाडी संभाळून चालवा.
 
मिथुन : घेण्यादेण्याच्या व्यवहारात सतर्क राहा. ऑफिसमध्ये जास्त मेहनत कराल. महत्त्वपूर्ण यश मिळण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यात काळजी घ्या. नेहमीच्या कामात आज तुम्हाला कोणाची मदत मिळणार नाही. कोणत्याही प्रकरणात घाईने निर्णय देण्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. काहीतर नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. ऑफिसमधील अडचणी थोड्या वाढू शकतात. 
 
कर्क : काही ठरवलेली काम पूर्ण न झाल्याने तुम्ही दु:खी होऊ शकता. पैसे खर्च होण्याचे योग आहेत. तणाव आणि धावपळीचा दिवस राहिल. जास्त काम कराल पण फायदा कमी मिळेल. आज तुम्ही कोणत्यातरी प्रकारचा हलगर्जीपणाही करु शकता. परिवारातील मोठ्या व्यक्तीची तब्येत खराब होऊ शकते. 
 
सिंह : कामकाजात यश मिळेल. फायद्याची बोलणी आणि करार होतील. नोकरदार वर्गालाही अंशिक धन लाभ होण्याचे योग आहेत. आज कामकाजात मेहनत जास्त करावी लागेल. तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळेल. वैवाहीक आयुष्यात आनंद मिळेल. जर प्रयत्न केलात तर जवळजवळ सर्वच कामातून तुम्हाला फायदा मिळेल. तब्येत सर्वसाधारण राहील. 
 
 कन्या : आज तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागेल पण याचा फायदा मात्र कमी मिळेल. व्यवसायात चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. जुने ताण संपू शकतो. चंद्र तुमच्या कर्मभावाने मनातील भाव पाहील. जुनी काम संपवण्याचे ठरवाल. जोडीदारासोबत फिरायला जाल. आज रोमॅंटीक मूडमध्ये असाल. 
 
तूळ : गुंतवणूक विचारपूर्वक करा. नोकरदारवर्गाने कामकाज टाळू नका. सहकार्यांची मदत मिळेल. धन आणि पारिवारीक सहकार्य मिळेल. करियर आणि कामात यश मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीच्या जोरावर इतरांवर प्रभाव पाडाल. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. आरोग्य ठिकठाक राहील. 
 
वृश्चिक : व्यवसायातील त्रास वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला थोड सतर्क राहावे लागेल. आरोग्याशी तडजोड करु नका. जुने आजार डोकं वर काढतील. हाथ-पाय आणि अंगदुखी होऊ शकते. तुमचं नुकसान करणारी बातमी कळू शकते. कोणत्याही स्थितीत विरोध कराल तरी त्रास तुम्हालाच होणार आहे. कोणते नवे काम सुरू करु नका. सावधतता बाळगा. 
 
धनु : अचल संपत्तीचा फायदा होण्याचे योग आहेत. व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला योग आहे. प्रेमासाठी चांगला दिवस आहे. प्रेमी किंवा जोडीदारासोबत वेळ घालवाल. परिवाराचे वातावरण चांगले राहील. नोकरी आणि व्यवसायातील महत्त्वाची कामे आज पूर्ण होतील. मालमत्तेच्या प्रकरणात फायदा होईल. कोणताही निर्णय घेतना विचारपूर्वक घ्या. तुम्ही केलेल्या कामाचे कौतूक होईल. 
 
मकर : बेरोजगारांना रोजगार मिळेल. अधिकाऱ्यांना मदत मिळेल. सहकाऱ्यांना कामात मदत कराल. तुमची अडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही तुमच्या काम आणि मेहनतीने टीकाकारांची तोंड बंद करु शकता. कोणत जुने कर्ज राहिले असेल तर ते पूर्ण करु शकता. कार्यालयात अधिकारी तुमच्यावर खुश होतील. पती पत्नीचे संबध मजबूत होतील. कामकाजाशी संबधित नवी गोष्ट तुम्हाला कळू शकेल. 
 
कुंभ : नोकरदार वर्गाला प्रमोशन मिळू शकते. वरिष्ठांची मदत मिळेल. कोणते नवे काम देखील आज करु शकता. नव्या लोकांची मदत होईल. जुन्या योजना पूर्ण झाल्याने आनंद मिळेल. जोडीदाराच्या सल्ल्यामुळे धनलाभ होईल. आजचा दिवस प्रेमासाठी चांगला असेल. जुने आजारपण डोकं वर काढतील. आपल्या तब्येतीची काळजी घ्या. 
 
मीन : व्यवसायात मोठा निर्णय घेताना सावधानी बाळगा. नुकसान होण्याचे योग आहेत. कोणत तरी राहू शकत. कोणत्या खास कामावरून संभ्रम जाणवेल. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये जुन्या चुकांमुळे मनात भीती वाटत राहील. कोणती ठरलेली योजना फसण्याची शक्यता आहे. मुलांमूळे डोक्याला ताप वाढेल. 


- दीपक शुक्ला