Sri Sri Ravi Shankar : आताच्या घडीची मोठी बातमी. आर्ट ऑफ लिव्हिंगचे आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे  इमरजन्सी लँडिंग करण्यात आले आहे. श्री श्री रवीशंकर सुरक्षित असून त्यांना कोणताही धोका नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, खराब वातावरणामुळे विमानाचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्री श्री रविशंकर आणि इतर चार जणांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे आज सकाळी तामिळनाडूतील इरोडमधील सत्यमंगलम येथे खराब हवामानामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवासी सुखरुप आहेत. हवामान स्वच्छ झाल्यानंतर हेलिकॉप्टरने 50 मिनिटांनी उड्डाण झाले. त्यानंतर ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले.



तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील ग्रामीण भागात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री श्री तामिळनाडूला काही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. पण खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे लँडिंग सुरक्षित मानले जात होते. त्यामुळे हे लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरचे लँडिंगची वेळ सकाळी 10.30 ते 11 च्या सुमारास सांगण्यात आली होती. मात्र, लँडिंगच्या 50 मिनिटांनंतर हवामान स्वच्छ झाल्यावर हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण केले.