पत्नीच्या नावाने सुरू करा NPS अकाऊंट; दर महिने मिळवा हमखास उत्पन्न
भविष्यात तुमच्या पत्नीला कोणासमोर हात पसरवायची वेळ येऊ नये. म्हणून तिच्यासाठी नियमित उत्पन्नाचे नियोजन तुम्ही करू शकता.
मुंबई : तुम्ही नोकरी करीत असाल तर निश्चितच तुम्ही भविष्यासाठी काहीतरी योग्य प्लॅन तयार करीत असाल. भविष्यात तुमच्या पत्नीला कोणासमोर हात पसरवायची वेळ येऊ नये. म्हणून तिच्यासाठी नियमित उत्पन्नाचे नियोजन तुम्ही करू शकता.
आपल्या पत्नीच्या नावाने तुम्ही न्यू पेंशन स्किममध्ये अकाऊंट सुरू करू शकता. तुमच्या पत्नीच्या वयाच्या 60 वर्षानंतर तिला नियमित पेंशन सुरू होईल. दरमहिना तुमच्या पत्नीला किती पेंशन मिळेल हे देखील तुम्ही ठरवू शकता. त्यामुळे तुमची पत्नी 60 वर्षानंतर कोणावर अवलंबून राहणार नाही.
पत्नीच्या नावाने न्यू पेशन सिस्टिममध्ये अकाऊंट सुरू करता येईल. आपल्या सुविधेनुसार दर महिना किंवा वार्षिकदेखील पैसे जमा करता येईल. 1000 हजार रुपयांपासूनसुद्धा NPSचे अकाऊंट सुरू करू शकता. पत्नीचे वय 60 वर्ष झाल्यावर NPS अकाऊंट मॅच्युअर होते. नव्या नियमांनुसार 65 वर्षापर्यंत NPS अकाऊंट चालवू शकता.
जर तुमच्या पत्नीचे वय 30 वर्ष असेल, आणि NPS अकाऊंटमध्ये दरमहिना 5000 रुपये जमा करीत आहात. तर त्यांना वार्षिक 10 टक्के रिटर्न मिळत असेल तर, 1.12 कोटी रुपये जमा होईल. त्यातील 45 लाख रुपये मिळतील आणि त्याशिवाय त्यांना 45 हजार रुपयांची पेंशन दरमहा मिळेल. ही पेंशन त्यांना अजिवन मिळेल.