Home Loan : (new home) नवं घर खरेदी करण्याचा मुद्दा जेव्हा समोर येतो तेव्हा सर्वात आधी पैशांची जुळवाजुळव कशी करायची, लोन अर्थात कर्ज किती काळासाठी आणि कुठून घ्यायचं ही सारी आकडेमोड सुरु होते. तुम्हीही जर येत्या काळात घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, एक महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी. सध्या सर्वत्र सणासुदीचे दिवस असून, या दिवसांमध्ये सर्वत्र सवलतींचा पाऊस सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. (Banking) बँकिंग क्षेत्रही यात मागे राहिलेलं नाही. कारण, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अशी ओळख असणाऱ्या भारतीय स्‍टेट बँक म्हणजेच एसबीआय (State Bank of India- SBI) कडून गृहकर्ज घेणाऱ्यांना मोठी सवलत देण्यात येत आहे. आता ही सवलत नेमकी कोणत्या प्रमाणात दिली जात आहे ते मात्र एकदा पाहून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(SBI Website) एसबीयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार या Discount ची सुरुवात 4 ऑक्टोबरपासून करण्यात आली आहे. याचा फायदा 31 जानेवारी 2023 पर्यंत घेता येणार आहे. तुम्हीही येत्या काही महिन्यांमध्ये घर घेण्याच्या तयारीत असाल तर एकदा या सवलतींविषयी नक्की माहिती घ्या. 


गृहकर्जाच्या व्याजदरात बँकेकडून कपात (home loan intereset rate)
SBI च्या सर्वसामान्य गृहकर्जांचे व्याजदर  8.55% ते 9.05% इतके होते. पण, फेस्टिव कॅम्पेन ऑफरअंतर्गत या दरांत 0.15 ते 0.30 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळं आता ज्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांना 8.40% ते 9.05% इतका व्याजदर लागू असेल. इथं लक्ष देण्याजोगी बाब अशी, की बँक लोनच्या सर्वोत्तम व्याजदरांसाठी सिबिल स्कोरही चांगला असणं गरजेचं आहे. 


अधिक वाचा : Cheque Bounce झाल्यास खैर नाही; पडणार 'इतका' भुर्दंड


 


बँकेच्या नियमांनुसार (banking rules) ज्यांचा सिबिल स्‍कोर 800 किंवा त्याहून जास्त आहे त्यांना 8.40% टक्क्यांच्या व्याजदराने कर्ज मिळेल. 8.55% च्या तुलनेत तो 15 टक्क्यांनी कमी आहे. 750 हून कमी सिबिल स्कोर असणाऱ्यांना 0.25 टक्क्यांचा फायगा मिळेल. तर, 700 ते 749 सिबिल स्कोर असणाऱ्यांना 0.20 टक्के इतका फायदा मिळेल. 700 हूनही कमी सिबिल स्कोर असणाऱ्यांना मात्र कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही.